Tue, Mar 02, 2021 10:41
नगर : शॉर्टसर्किटने जिनिंग मिलला आग; ३ कोटींचे नुकसान 

Last Updated: Feb 22 2021 1:22PM

शेवगाव : पुढारी प्रतिनिधी

शॉटसर्किटने लागलेल्या आगीत अमरापूर येथील वाय. के.कॉटन अॅण्ड जिनिंग मिल मधील कपाशीच्या गाठी व मशनिरी जळून सुमारे तीन कोटीचे नुकसान झाले. ही घटना आज (सोमवार) पहाटे घडली.

अधिक वाचा : सीएम ठाकरेंचा शब्द मानला; शरद पवारांकडून सर्व नियोजित कार्यक्रम रद्द 

अमरापूर येथे नगर राज्यमार्गालगत असणाऱ्या वाय.के.कॉटन अॅण्ड जिनिंग मिलला सोमवारी पहाटे साडेचार वाजता शॉटसर्किटने आग लागली. ही आग मिलच्या शेजारी राहणाऱ्या गोरक्ष बोरुडे यांच्या लक्षात आल्याने त्यांणी तातडीने जिनिंग मालक प्रविण शिंदे व नामदेव निकम यांच्याशी संपर्क साधला. सदर मालक घटनास्थळी येईपर्यंत तेथील कामगारांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पंरतु वारे असल्याने ही आग अधिकच भडकली. 

अधिक वाचा : हेच का ते अच्छे दिन? पोस्टर लावून शिवसेनेचा मोदी सरकारवर प्रहार!

या दरम्‍यान अग्‍निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यानंतर वृध्देश्वर व ज्ञानेश्वर कारखान्याचे अग्निशामन दलाचे पंप घटनास्थळी दाखल झाले. या अग्‍निशमन दलाच्या अथक प्रयत्‍नानंतर आग आटोक्यात आली. आगीत ७० ते ८० लाखांचे बेलप्रेसिंग मशीन, २ कोटीच्या ९०० ते १ हजार कपाशीच्या गाठी असे सुमारे तीन कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.