Sat, Aug 08, 2020 12:11होमपेज › Ahamadnagar › नगर : माजी मंत्री राम शिंदे यांना पितृशोक

नगर : माजी मंत्री राम शिंदे यांना पितृशोक

Last Updated: Jul 05 2020 1:24AM
जामखेड : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे वडील शंकर शिंदे यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु तब्येतीत सुधारणा झाली नाही. आज (दि. ४) रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला

जामखेड तालुक्यातील चोंडीगावात त्यांचा जन्म झाला. वयाच्या अनेक वर्ष हळगाव पंचक्रोशीत सालकरी गडी म्हणून काम केले. एक प्रमाणिक शेतमजूर, सालकरी, ते कॅबिनेट मंत्र्यांचे वडील म्हणून नाव मिळाले. मुलगा मंत्री झाला, तरी शंकर शिंदे यांनी स्वतःमध्ये कोणताही बडेजाव ठेवला नाही. एक सामान्य माणूस म्हणून प्रत्येकाला आपुलकीने वागणूक दिली. 

शंकर शिंदे यांच्या निधनाची बातमी कळताच जामखेड कर्जत मतदारसंघामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा माजी मंत्री राम शिंदे व चार मुली व नातवंडे असा परिवार आहे. शंकर शिंदे यांचा अंत्यविधी रविवार दिनांक ५ जुलै रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे.