Fri, Feb 26, 2021 07:02
अहमदनगर ः देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी बसचा अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

Last Updated: Feb 22 2021 9:39AM

अहमदनगर ः पुढारी ऑनलाईन 

नेवासा तालुक्यातील देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी बसच्या भयानक अपघात झाला असून ५ जण ठार झाले आहेत. पहाटे २ च्या सुमारास हा अपघात आहे. या अपघातात कारमधील पाच जण ठार झालेले आहेत, ते सर्व जण जालना जिल्ह्यातील आहेत. 

वाचा ः राममंदिरासाठी चंदा वसुली करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे चंद्राला भिडलेले भाव खाली आणा

मिळालेल्या माहितीनुसार स्वीफ्ट कार ही औरंगाबादमधून अहमदनगरला येत होते अन् नगरकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बससी कारची जबरदस्त धडक झाली. अपघात इतका भयावक होता की, कारमधील ५ जण जागीच ठार झाले. हे सर्व जण जालना जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

वाचा ः Bigg Boss 14 winner : या १० कारणांमुळे रुबिना दिलैक झाली बिग बॉस १४ ची विजेती!

कार आणि बसला समोरून धडक दिल्यामुळे कारचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच नवासेचे फौजदार भरत दाते आणि त्यांचे सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना ग्रामीम रुग्णालयात तातडीने हलविले. मात्र, उपचारापूर्वीच पाच जणांचा मृत्यू झाला.