Fri, Oct 02, 2020 01:05होमपेज › Ahamadnagar › नगर : संगमनेरात ५ कोरोना बाधित रूग्‍ण 

नगर : संगमनेरात ५ कोरोना बाधित रूग्‍ण 

Last Updated: May 31 2020 8:42PM
संगमनेर :पुढारी वृत्तसेवा 

संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथील कंटेनमेंट झोन 2 मधील दोन तरूणांना तसेच संगमनेर तालुक्यातील खळी  आणि कवठे कमळेश्वर येथील एक तसेच मुंबई वरून आलेली महिला अशा पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या बाबतचा वैद्यकीय अहवाल जिल्हा रूग्णालया कडून प्राप्त झाला असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. 

संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये सध्या कोरोनाने चांगलाच हाहाकार माजवला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये दररोज कोरोनाची रुग्णसंख्या  वाढतचं आहे. त्यामुळे प्रशासन चांगलेच  हतबल झाले आहे. संगमनेर शहरातील नाईकवाड पुरा मदिना नगर, भारत नगर, मोमीन पुरा तसेच संगमनेर तालुक्यातील धांदरफळ निमोन निंबाळे केळेवाडी घुलेवाडी या गावांमध्ये कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.

संगमनेर शहरातील मदिना नगर भागातील दोन, भारत नगर भागातील दोन, मोमीन पुरा निमोण आणि कनकुरी असे सात कोरोनाबधित रूग्ण शनिवारी आढळून आले होते, तर आज रविवारी संध्याकाळी उशिरा जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून अहवाल प्राप्त झाले. त्या अहवालामध्ये शहरातील कोल्हेवाडी रोड येथील २२ आणि २४ वर्षाच्या दोघा तरूणांना  तसेच संगमनेर तालुक्यातील खळी येथील मुंबईवरून आलेल्या २७  वर्षीय  आणि क्‍वारंटाईन केलेला एक तरूण तसेच ३७ वर्षीय कवठे कमळेश्वर येथील तरूणाला अशा चार जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे संगमनेर शहरासह खळी आणि कवठे कमळेश्वर गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

घुलेवाडीच्या डॉक्टरच्या संपर्कातील दहा जणांचे अहवाल निगेटिव्ह 

सिन्नर तालुक्यातील दापूर येथे वैद्यकीय सेवा करत असणाऱ्या कोरोनाबाधित डॉक्टरवर नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत,  मात्र त्या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या राजापूर येथील ६, चिंचोली गुरव २, घुलेवाडीच्या  मालपाणी नगर  येथील २ अशा १० नातेवाईकांना तपासणी करण्यासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते, परंतु या  सर्व नातेवाईकांचा  तपासणी अहवाल  निगेटिव्ह आल्यामुळे  राजापूर चिंचोली गुरव आणि मालपाणी नगर मधील रहिवाशी नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

 "