Tue, Aug 04, 2020 11:12होमपेज › Ahamadnagar › नगर : जिल्ह्यात नवीन ४८ कोरोनाग्रस्तांची भर  

नगर : जिल्ह्यात नवीन ४८ कोरोनाग्रस्तांची भर  

Last Updated: Jul 17 2020 1:40AM
नगर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात बुधवारी आणखी 48 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत.  यामध्ये संगमनेर तालुक्यातील 36, नगर शहरातील 6 व अकोले तालुक्यातील 5, तर राहाता तालुक्यातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे  जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 124 इतकी झाली आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना प्रयोगशाळेत बुधवारी (दि.15) 41 जणांचे तर खासगी प्रयोगशाळेत 7, असे एकूण 48 व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले. 200 व्यक्तींचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत. संगमनेर तालुक्यात निमोण येथे 3, कासार दुमाला येथे 2, गुंजाळवाडीत 2, माहुली येथे 8, साकूर येथे 1, तळेगाव दिघे येथे 1, वडगाव येथे 1 तर संगमनेर शहरात 13 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. खासगी प्रयोगशाळेत देखील संगमनेरच्या 5 व्यक्तींचा समावेश आहे. 

नगर महापालिका क्षेत्रात 6 जण बाधित आढळले आहेत. अकोले तालुक्यात देवठाण येथे 1, उंचाखडक येथे 1, चास येथे 3 रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यात देखील एक कोरोनाबाधित आढळला आहे. 

62 रुग्णांची कोरोनावर मात 

जिल्ह्यातील  62 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये नगर महापालिका क्षेत्रातील 14, संगमनेरातील 15, अकोले तालुक्यातील 7, नगर ग्रामीण भागातील 8, नेवासे तालुक्यातील 1, पारनेर तालुक्यातील 4, राहाता तालुक्यातील 2, शेवगाव तालुक्यातील 6, श्रीगोंदे तालुक्यातील 2 व श्रीरामपूर तालुक्यातील 3 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त संख्या 727 इतकी झाली आहे.