Mon, Sep 28, 2020 07:23होमपेज › Ahamadnagar › नगर जिल्ह्यात वाढले ४३५ नवे रुग्ण

नगर जिल्ह्यात वाढले ४३५ नवे रुग्ण

Last Updated: Aug 04 2020 1:51AM
नगर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात काल कोरोना रुग्ण संख्ये 6 वाजेपर्यंत 435 रुग्णांची वाढ झाली. उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 2 हजार 243 झाली आहे. जिल्ह्यात 263 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता 4  हजार 25 झाली. 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 43, अँटीजेन चाचणीत 194  आणि खासगी प्रयोगशाळेत 198  रुग्ण आढळून आले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 43 रुग्ण बाधित आढळून आले. बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर 28, संगमनेर 2, पाथर्डी 1, नगर ग्रामीण 3, भिंगार 3, पारनेर 3, शेवगाव 1, कोपरगाव 1 आणि जामखेड येथील 1 रुग्णाचा  समावेश आहे. 

अँटीजेन चाचणीत 194  जण बाधित आढळुन आले. या मध्ये नगर शहर 54, संगमनेर 12,  राहाता 21, नगर ग्रामीण 8, नेवासे 8, श्रीगोंदे 17, पारनेर 8, शेवगाव 29,  कोपरगाव 26, जामखेड 6 आणि कर्जत 5 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 198 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहर 164, संगमनेर 8, राहाता 1, पाथर्डी 7, नगर ग्रामीण 6,  श्रीरामपूर 1, पारनेर 2, अकोले 1, राहुरी 1, शेवगाव 1, कोपरगांव 1 आणि कर्जत येथील 5 रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, काल 263 रुग्णांना घरी सोडण्यात आले.  नगर शहर 113, संगमनेर 55, राहाता 10, पाथर्डी 18, नगर ग्रामीण 3, श्रीरामपूर 8, भिंगार 3, नेवासे 4, श्रीगोंदे 5, अकोले 18, राहुरी 2, कोपरगाव 7, जामखेड 1, कर्जत 11, इतर जिल्हा 5 जणांचा समावेश आहे.

 "