नवरात्र महोत्सव : तुळजाभवानी देवीचे ९० हजार भाविकांनी घेतले दर्शन | पुढारी

नवरात्र महोत्सव : तुळजाभवानी देवीचे ९० हजार भाविकांनी घेतले दर्शन

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : नवरात्र महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी 90 हजार भाविकांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. देवीचे दही आणि दुधाचे अभिषेक मंगलमय वातावरणात पार पडले. अभिषेकानंतर जांभळ्या रंगाचा तुळजाभवानी देवीला घातलेला शालू आणि केलेली सजावट अत्यंत देखणी आणि नेत्रदीपक होती.

लाल आणि सोनेरी रंगांमधील नेतृत्व दीपक मनमोहक फुलांची केलेली सजावट आणि तुळजाभवानीला घातलेले प्राचीन मौल्यवान अलंकार अंगावर नेसवलेला जांभळ्या रंगाचा शालू आणि भवानी मातेची पूजा, चांदीच्या सिंहासनावर सजावट करण्यात आली.

मंगळवारी रात्री दहा वाजता तुळजाभवानी देवीचा निघालेल्या छबिरामध्ये हजारो भाविकांची उपस्थिती होती. मध्यरात्री दर्शन मंडपामध्ये भाविकांना सोडण्यात आले. त्यानंतर धर्मदर्शन आणि मुखदर्शन या रांगा सुरू झाल्या, सकाळी सात वाजता देवीचे दही आणि दुधाचे अभिषेक सुरू झाले. त्यानंतर देवीची पूजा संपन्न झाली. आरती आणि नैवेद्य देवीला दाखवण्यात आला. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या दिवशी मंदिर परिसर आणि गाभारा परिसर फुलांची सजावट करण्यात आली होती.

संबंधित बातम्या

दरम्यान, मुसळधार पावसामुळे भाविकांना पावसाचा त्रास सहन करावा लागला. पावसातही जवळपास 90 हजार भाविकांनी दर्शन घेतले, असे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.

हेही वाचा

नववीतील मुलावर शाळेतील मुलाने केला कोयत्याने वार, आंबेगाव तालुक्यातील खळबळजनक घटना 

Gold Rate : सोने-चांदीच्या दरात माेठी घसरण; पाहा किती आहे दर 

कल्याण-डोंबिवली : अनधिकृत बांधकामप्रकरणी २७ विकासकांवर गुन्हा दाखल

Back to top button