तेलंगणात खासदाराला भोसकले

तेलंगणात खासदाराला भोसकले
Published on
Updated on

हैदराबाद; वृत्तसंस्था : तेलंगणातील मेडकचे खासदार आणि विधानसभा निवडणुकीतील बीआरएस (भारत राष्ट्र समिती) उमेदवार कोथा प्रभाकर रेड्डी यांच्यावर सोमवारी चाकूहल्ला झाला. सिद्धीपेटमधील सुरमपल्ली गावात ते निवडणूक प्रचारार्थ पोहोचले आणि ही घटना घडली.

हल्लेखोराने प्रभाकर यांच्या पोटात वार केले. जमावाने आरोपीला पकडून बेदम मारहाण केली व पोलिसांच्या ताब्यात दिले. समर्थकांनी प्रभाकर यांना तातडीने गजवेल रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना हैदराबादला पुढील उपचारार्थ हलवण्यात येणार आहे, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. प्रभाकर यांनी 2014 मध्ये के. मेडक लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news