क्रौर्याची परिसीमा! डोळे, तोंड, प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव

Kolkata doctor rape- murder case | तोंड दाबले, डोके भिंतीवर आपटले- पोस्टमार्टम रिपोर्ट
Kolkata doctor rape- murder case
कोलकाता : पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या मृत्यूचा पोस्टमॉर्टम अहवाल आला आहे.File photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या (Kolkata doctor rape- murder case) पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या मृत्यूचा पोस्टमॉर्टम अहवाल समोर आलाय. त्यांचा गळा दाबून हत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यांचा गळा दाबल्याने त्यांची थायरॉईड कास्थी (कूर्चा) ऊती तुटली. तसेच त्यांच्यावर नराधमाने विकृतपणे लैंगिक अत्याचार केल्याने त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खोल जखम आढळून आली असल्याचे चार पानी अहवालात म्हटले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

कोलकातामधील सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेजच्‍या सेमिनार विभागात शुक्रवारी, ९ ऑगस्‍ट रोजी पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी ३१ वर्षीय महिला डॉक्‍टरचा रक्तबंबाळ अवस्थेतील अर्धनग्न मृतदेह आढळून आला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज (दि.१३) देशभरातील निवासी डॉक्टरांनी बंद पुकारला आहे.

पोस्टमार्टम अहवालात काय म्हटलंय?

९ ऑगस्ट रोजी पहाटे ३ ते ५ दरम्यान खून आणि बलात्काराची घटना घडल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पोटावर, ओठांवर, बोटांवर आणि डाव्या पायावर जखमा आढळून आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे नाक आणि तोंड दाबले गेले आणि त्या आरडाओरडा करु नये म्हणून त्यांचे डोके भिंतीवर आपटले गेले होते.

पीडितेचे तोंड आणि गळा दाबला

पीडितेच्या चेहऱ्यावरील ओरखडे हे आरोपीच्या नखांमुळे झाले आहेत. यावरून असे दिसून येते की पीडितेने आरोपीला जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. "पीडितेने आरडाओरड करु नये यासाठी तिचे तोंड आणि गळा दाबला गेला. त्यांचा गळा दाबल्यामुळे थायरॉईड कूर्चा ऊती तुटली," असे पोस्टमॉर्टम अहवालात म्हटले आहे.

Kolkata doctor rape- murder case : प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव

पीडितेचे दोन्ही डोळे, तोंड आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या डोळ्याला झालेल्या जखमेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सीसीटीव्ही फुटेज आले समोर

पोस्ट ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह शुक्रवारी सकाळी सरकारी रुग्णालयाच्या सेमिनार रूममध्ये आढळून आला होता. या प्रकरणी नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला अटक करण्यात आली आहे. रॉय हा आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील पोलिस चौकीत तैनात होता. यामुळे त्याला सर्व विभागांमध्ये प्रवेश मिळत होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला शनिवारी अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो डॉक्टरचा ज्या ठिकाणी खून झाला त्या इमारतीत प्रवेश करताना दिसून आला आहे.

Kolkata doctor rape- murder case
'कृपया, मला फाशी द्या..' : भयावह कृत्‍यानंतर नराधमाला उपरती

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news