गेमिंग ॲप ते क्रिप्टो अकाउंट... ईडीने केला चीनच्‍या ४०० कोटींच्‍या घोटाळ्याचा पदार्फाश

२५ कोटी रुपये गोठवले, कोलकात्‍यात अनेक ठिकाणी छापे
online gaming app
प्रातिनिधिक छायाचित्र(Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताविरोधात कारवायांमध्‍ये गुंतलेल्‍या चीनच्‍या गेमिंग ॲपचा सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) धडक कारवाई करत पदार्फाश केला आहे. सुमारे 25 कोटी रुपयांची रक्कम गोठवली आहे. 'ईडी'ने FIEWIN या ऑनलाइन गेमिंग ॲपमधील चिनी नागरिकांची क्रिप्टो खातीही गोठवली आहेत. हे ॲप दीर्घकाळापासून भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतले असल्याचा आरोप आहे. या गेमिंग ॲपद्वारे भारतातून चीनमध्ये ४०० कोटी रुपये हस्‍तांतरीत (ट्रान्सफर) झाल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आल्‍याचे वृत्त 'बिझनेस स्टँडर्ड'ने दिले आहे. (online gaming app)

घोटाळा कसा झाला?

Fiewin ने वापरकर्त्यांना मिनी-गेम्सद्वारे सहज कमाई करण्याचे आमिष दाखवले. एकदा वापरकर्त्यांनी निधी जमा केल्यावर, ॲपने पैसे काढण्यास प्रतिबंध केला. वापरकर्त्यांचे पैसे अडकवले.जागतिक क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजशी जोडलेल्या डिजिटल वॉलेट्सचा वापर करून अपहार करुन लाटलेला निधी गायब केला. स्थानिक पोलिसांना फिविन ॲपवर निधी गमावलेल्या पीडितांच्‍या तक्रारी मिळू लागल्‍या. घोटाळ्यांची तक्रार करणाऱ्या पीडितांच्या वाढत्या संख्येमुळे, या प्रकरणाचा तपास सक्‍तवसुली संचालनालयाकडे (ईडी) सोपविण्‍यात आला.

कोलकात्यात अनेक ठिकाणी टाकले छापे

काही दिवसांपूर्वीच ईडीने या गेमिंग ॲपच्या विरोधात देशात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. यादरम्यान, ईडीने अनेक भारतीय नागरिकांना अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीदरम्यान या गेमिंग ॲपद्वारे भारतातून 400 कोटी रुपये चीनमध्ये कसे पाठवण्यात आले होते, हे उघड झाले आहे. या ॲपद्वारे ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंग फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणी, ऑनलाइन गेमिंग ॲप "FIEWIN" द्वारे फसवणूक आणि कट रचल्याबद्दल आयपीसीच्या कलम ४२०,४०६ आणि १२० ब अंतर्गत 16 मे 2023 रोजी कोलकाता येथील कोसीपोर पोलिस स्टेशनमध्ये प्रथम गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चीनी नागरीक भारतीयांच्या मदतीने ॲप चालवत होते

आता ईडीला पीएमएलए अंतर्गत तपासात असे आढळून आले आहे की, चीनी नागरिक भारतीय नागरिकांच्या मदतीने हे ॲप चालवत आहेत. राउरकेला, ओरिसा येथील रहिवासी असलेल्या अरुण साहू आणि आलोक साहू यांनी रिचार्ज करण्यासाठी कमिशन दिले होते, हे ॲपद्वारे त्यांच्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केलेले पैसे क्रिप्टोमध्ये बदलले होते चलन त्यांनी विदेशी क्रिप्टो एक्स्चेंज Binance वर चीनी नागरिकांच्या वॉलेटमध्ये या ॲपमधून कमावलेले क्रिप्टो चलन जमा केले आणि लॉन्डर केले.

पाटणा येथील इंजिनिअरने केली होती मदत

बिहारमधील पाटणा येथील अभियंता चेतन प्रकाश याने संबंधितांना रुपयाचे रूपांतर क्रिप्टो करन्सीमध्ये (USDT) करण्यात मदत करून मनी लाँड्रिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. जोसेफ स्टॅलिन नावाच्या आणखी एका व्यक्तीने गांसू प्रांतातील पाय पेंग्युन नावाच्या एका चिनी नागरिकाला त्याच्या स्टुडिओ 21 प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सह-संचालक बनण्यास मदत केली आणि जोसेफ चेन्नईचा रहिवासी असल्‍याचे ईडीच्‍या तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news