लैंगिक अत्याचार, बलात्कार प्रकरणी माजी खासदार प्रज्वल रेवांना याच्याविरुद्ध २१४४ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्याने हासनच्या होळेनरसीपूर येथे लैंगिक शोषण आणि अत्याचार केल्याचे आरोप पत्रात नमूद करण्यात आले आहे.
प्रज्वल रेवांना सध्या कारागृहात आहेत. लैंगिक अत्याचार, बलात्कार प्रकरणाचा तपास करणार्या 'एसआय'टीने पहिल्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात होळेनरसिपूर पोलीस स्थानकात माजी मंत्री एच. डी.रेवण्णा आणि त्यांचा मुलगा प्रज्वल रेवण्णाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करणार्या 'एसआयटीने' एच. डी. रेवण्णा यांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली होती.
पीडित महिलेच्या मुलाने रेवण्णा पिता-पुत्राविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली आहे. हसनमध[ल घर. बंगळूर मधील निवासस्थानी भेट देऊन एसआयटी अधिकार्यांनी पंचनामा केला होता. धमकावून लैंगिक शोषण करण्यात आल्याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये करण्यात आला असून 2144 पानी आरोप पत्रामध्ये आरोपीविरुद्ध 123 साक्षी नोंदविण्यात आले आहेत. एसआयटी पथकाने बंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.