पुढारी ऑनलाईन डेस्क : "अधर्माचा पराभव होऊन धर्माचा विजय झाला पाहिजे", अशी भगवान श्रीकृष्णांची शिकवण आहे. आम्ही भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशाचे पालन करत आहोत. मला लोकांचे भले करायचे आहे. कुंता तलावाच्या जमिनीची मुक्तता करणे हा एकमेव उद्देश आहे. अतिक्रमण करणाऱ्यांवर आम्ही कारवाई करुन मागे हटणार नाही, आम्ही भगवद्गीतेने प्रेरित होऊनच रंगारेड्डी जिल्ह्यातील शिल्पराममजवळील माधापूर हायटेक सिटीलगत बांधलेले एन कन्व्हेन्शन (n convention) सेंटर पाडले आहे," अशा शब्दांमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अभिनेता नागार्जुन यांच्या एन. कन्व्हेन्शन सेंटरवरील कारवाईचे समर्थन केले.
अभिनेता नागार्जुन यांनी बेकायदा बांधलेले एन कन्व्हेन्शन सेंटर शनिवारी बुलडोझरने पाडण्यात आले. कुंता तलावाच्या जमिनीवरील हे बांधकाम बेकायदा असल्याचा राज्य सरकारचा आरोप आहे. हैदराबाद आपत्ती निवारण आणि मालमत्ता संरक्षण यंत्रणेच्या ही धडक कारवाई शनिवारी केली होती. कुंता तलावालगतच्या एन. कन्व्हेन्शन सेंटरवर शनिवारी बुलडोझर चालविण्यात आले. इन्सेट नागार्जुन. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ३ हॉल होते. अनेक भव्य कार्यक्रम इथे होत असत. राजकीय पक्षांचे मेळावे, संघटनांची अधिवेशने, दिमाखदार विवाहसोहळे आदींनी हे सेंटर गजबजलेले असे. एन कन्व्हेन्शन सेंटर दहा एकरमध्ये पसरले आहे. येथील बांधकाम जमीन बेकायदा वापर आणि पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्याचे तेलंगणा सरकारने स्पष्ट केले होते.
नागार्जुन यांनी एन कन्व्हेन्शन सेंटरवरील कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. ही जागा भाडेतत्त्वावरील असून, तलावाची एक इंच जमीनही आम्ही वापरलेली नाही. बांधकाम पाडण्यापूर्वी नोटीस तरी द्यायला हवी होती. न्यायालयाने पाडकामाचा हा आदेश दिला असता तर मी स्वतःहून बांधकाम काढले असते. अधिकाऱ्यांच्या या कारवाईविरोधात मी न्यायालयात दाद मागेन, असेही नागार्जुन यांनी म्हटलेले होते.
आज एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करताना तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की, रंगारेड्डी जिल्ह्यातील शिल्पराममजवळील माधापूर हायटेक सिटीलगत बांधलेले एन कन्व्हेन्शन सेंटरच्या मालमत्तेचे मालक असलेल्या शक्तिशाली व्यक्तींकडून प्रचंड दबाव आहे; परंतु ही आपल्या भविष्याच्या रक्षणाची बाब आहे. भगवान कृष्णाने शिकवल्याप्रमाणे, धर्माचा विजय झाला पाहिजे आणि अधर्माचा पराभव झाला पाहिजे," या विचारातून आम्ही ही कारवाई केली आहे.
हैदराबादमधील बेकायदेशीर अतिक्रमणांच्या विरोधात सुरू असलेल्या उद्ध्वस्त मोहिमेचे समर्थन करताना ते म्हणाले की, अशा बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करताना कोणीही, त्यांचा सामाजिक किंवा राजकीय प्रभाव असला तरीही, त्यांना सोडले जाणार नाही. भगवद्गीतेने प्रेरित होऊन, आम्ही हैदराबाद आपत्ती प्रतिसाद आणि मालमत्ता संरक्षण विभागाद्वारे फुल टँक लेव्हल भागात उभारलेल्या बेकायदेशीर बांधकामांना पाडण्याचा निर्धार केला आहे. नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सरकारच्या ठाम आहे. आम्ही भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशाचे पालन करत आहोत. दबाव असूनही आमच्या काही मित्रांकडे फार्महाऊस असूनही, HYDRAA ची निर्मिती तलाव आणि सरकारी मालमत्तांच्या रक्षणासाठी करण्यात आली आहे. त्याचा एक भाग म्हणून मला लोकांचे काही भले करायचे आहे. कुंता तलावाच्या मुक्तता करणे हा एकमेव उद्देश आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना कारवाई करताना आम्ही मागे हटणार नाही, असा निर्धारही रेड्डी यांनी यावेळी व्यक्त केला.