नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भेट घेतली. राष्ट्रपती भवनात राहुल गांधी यांनी जाऊन घेतलेली ही शिष्टाचार भेट होती.
राहुल गांधी यांनी लोकसभा विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रपतींची भेट घेतली. त्याअगोदर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील आणि जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.