कोलकातामध्ये आंदोलक-पोलिसांत धुमश्चक्री; पाण्याचे फवारे, अश्रूधुरांचा वापर

Nabanna Abhijan | आंदोलकांचा हावडा ब्रिजवर ठिय्या
Nabanna Abhijan
कोलकातामध्ये आंदोलक-पोलिसांत धुमश्चक्रीfile photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या राजीनाम्याची मागणी करत कोलकातामध्ये रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. राज्य सचिवालय नबन्नाजवळील हावडा ब्रिजवर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला, अश्रूधुरांच्या कांड्या फोडल्या, पाण्याच्या फवाऱ्याचा मारा केला. तरीही आंदोलक मागे हटायला तयार नव्हते. पोलिस-प्रशासन आंदोलकांना मागे हटवण्याचा प्रयत्न करत असताना आंदोलकांनी हावडा ब्रिजवर ठिय्या मांडला आहे.

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल प्रक्षिणार्थी महिला डॉक्‍टरावरील बलात्‍कार आणि हत्‍या प्रकरणी विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला नबन्ना अभिजन (Nabanna Abhijan) असे नाव दिले असून, विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्‍यान, ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट निवासस्थानाजवळही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. तसेच नबन्ना अभियानादरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवण्याचा कट रचल्‍याचा आरोपाखाली चार विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे, असे कोलकाता पोलिसांनी X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्‍यान, १० ऑगस्टपासून या घटनेचा निषेध करणारे डॉक्टर आणि डाव्या विद्यार्थी संघटनांनी 'नबन्ना अभियान' निषेध मोर्चात सहभागी होणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.

नबन्ना म्हणजे काय?

२०११ पूर्वी बंगालचे सचिवालय रॉयटर्स बिल्डिंग होते. २०११ मध्ये ममता बॅनर्जी सरकारने हावडा येथील हुबळी नदीच्या काठावरील एका इमारतीचे सचिवालय म्हणून रूपांतर केले. ज्याचे नाव नबन्ना ठेवले गेले. नब म्हणजे नवीन. (Nabanna Abhijan)

आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांचा 'दिल्ली फॉर्म्युला'

आंदोलकांना रोखण्यासाठी कोलकाता पोलिसांनी दिल्लीचा फॉर्म्युला स्वीकारला आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलकांना रोखण्यासाठी लोखंडी भिंत उभारण्यात आली होती. तसेच हे आंदोलन थांबवण्यासाठी कोलकात्यात भिंत उभारण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news