अमेरिकेकडून भारताला मोठं गिफ्ट; मिळाला पहिला सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प

PM Modi US Visit | मोदींचा सेमीकंडक्टरसाठी 'रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म'चा मंत्र
India USA semiconductor project
अमेरिकेकडून भारताला मोठं गिफ्ट; मिळाला पहिला सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आपला पहिला राष्ट्रीय सुरक्षा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प स्थापन करणार आहे. जो अमेरिका सशस्त्र सेना, सहयोगी सैन्य आणि भारतीय संरक्षण दलांना चिप्स पुरवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात शनिवारी विल्मिंग्टनमध्ये झालेल्या चर्चेनंतर या महत्त्वाकांक्षी भारत-अमेरिका संयुक्त प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. (India USA semiconductor project)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्कमधील इनडोअर स्टेडियममध्ये अनिवासी भारतीयांना संबोधित केले. त्यानंतर मोदींनी जगातील आघाडीच्या टेक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत (सीईओ) गोलमेज बैठकही घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाठीच्या कण्याशिवाय शरीराचा काहीच उपयोग नाही, त्याचप्रमाणे चिपशिवाय तंत्रज्ञान निरर्थक आहे. त्यामुळे या क्षेत्रातही आम्ही काम करत आहोत. हे काम जगात खूप पूर्वीपासून सुरू झाले आहे. आम्ही थोडा उशीरा सुरू करत आहोत. पण आपली ताकद अशी आहे की आपण जेव्हाही सुरुवात करतो तेव्हा पूर्ण वेगाने सुरू करतो. आम्ही 5G तंत्रज्ञानामध्ये खूप मागे होतो, परंतु आता आम्ही आघाडीवर आहोत. त्यामुळे भारत सेमीकंडक्टरबाबत गंभीर आहे. आम्ही हे लक्ष्य लवकरात लवकर पूर्ण करू. यासाठी आमचा रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म असा मंत्र आहे, असे मोदी म्हणाले. (India USA semiconductor project)

दरम्यान, भारत आणि अमेरिकेत राष्ट्रीय सुरक्षा, दूरसंचार आणि हरित ऊर्जा अनुप्रयोगमधील चिप्स तयार करण्यासाठी सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचा करार केला आहे. हा असा पहिला प्रकल्प आहे जिथे अमेरिकन सैन्याने भारतासोबत अत्यंत महत्वाच्या तंत्रज्ञानावर भागीदारी करण्यास सहमती दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news