पुढारी ऑनलाईन डेस्क : दंतेवाडा-विजापूर सीमेवरील जंगलात झालेल्या चकमकीत नऊ नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त 'ANI'ने दिले आहे.
दंतेवाडा विजापूर सीमेवरील जंगलात नक्षलवाद्यांनी आश्रय घेतला असल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलांना मिळाली. आज सकाळी 10:30 वाजता शोधमोहिम राबविण्यात आली. यावेळी नक्षलींनी पोलिस दलाचा पीएलजीए कंपनी क्रमांक 02 वर गेळीबार केला. चकमक सुरू झाली. आतापर्यंत 9 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांनी यश आले आहे, अशी माहिती बस्तरचे महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी दिली. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सध्या शोधमोहीम सुरू असून, ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.