पुढारी ऑनलाईन : भारतीय तेल विपणन कंपन्यांनी लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) कमर्शियल सिलिंडरच्या दरामध्ये वाढ केली आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी झेप घेतली आहे. (LPG Price Hike) दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी भारतीय तेल विपणन कंपन्यांनी 19 किलो LPG सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. मेट्रो सिटीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 62 रुपयांपर्यंत वाढली आहे. मात्र, 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. परंतु अनेक शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 2000 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषत: मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या मेट्रो शहरांमध्ये मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. कोलकातामध्ये 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 2000 रुपयांपेक्षा फक्त 35 रुपये कमी आहे. त्याच वेळी, 19 किलोचा एलपीजी सिलिंडर ज्याची किंमत दिल्ली आणि मुंबईमध्ये 1750 रुपयांपर्यंत होती ती आता 1800 रुपयांच्या पुढे गेली आहे. या नवीन किमती 1 नोव्हेंबर 2014 पासून लागू झाल्या आहेत.
दिल्ली : 1,802 रु.
कोलकाता : 1,911.50 रु.
मुंबई : 1,754.50 रु.
चेन्नई : 1964.50 रु