धक्कादायक ! रेल्वे रूळावर आढळले सिलिंडर

LPG Cylinder On Railway | उत्तरप्रदेशातील मोठी दुर्घटना टळली, महिन्यातील चौथी घटना
LPG Cylinder On Railway
हल्लेखोरांचा डाव उधळला ! रेल्वे स्थानकावर LPG सिलिंडर स्फोट दुर्घटना टळलीPudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील पेरांबूर रेल्वे रूळावर एलपीजी (LPG) सिलिंडर सापडला आहे. रविवारी (दि.२२ नोव्हेंबर) पहाटे येथील रेल्वे रूळावर मालगाडीच्या पुढे सिलिंडर दिसला, ज्यामुळे लोको पायलटने वेळेत ब्रेक लावला. दरम्यान मोठी रेल्वे दुर्घटना थोडक्यात टळल्याचे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.

उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये सप्टेंबरमधील ही चौथी घटना आहे जिथे अज्ञात हल्लेखोरांनी रेल्वे रुळावरून घसरण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी ८ सप्टेंबर रोजी प्रयागराजहून भिवानीकडे जाणाऱ्या कालिंदी एक्स्प्रेसने कानपूरमध्ये रुळांवर ठेवलेल्या एलपीजी सिलेंडरला धडक दिली होती.

भारतीय रेल्वेने 10 सप्टेंबर रोजी नोंदवले आहे की, ऑगस्टपासून देशभरात गाड्या रुळावरून घसरण्याचे १८ प्रयत्न झाले आहेत. जून 2023 ते आत्तापर्यंत, अशा २४ घटना घडल्या आहेत, ज्यात LPG सिलिंडर, सायकली, लोखंडी रॉड आणि सिमेंट ब्लॉक यांसारख्या वस्तू रुळांवर सापडल्या आहेत. भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार, १८ घटनांपैकी १५ घटना ऑगस्टमध्ये आणि चार घटना सप्टेंबरमध्ये घडल्या, ज्यात कानपूरमधील ताज्या ट्रेन रुळावरून घसरण्याच्या प्रयत्नाचाही समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news