Kolkata Rape | पीडितेच्या शरीरात १५० मिलिग्रॅम विर्य; सामूहिक बलात्काराची शक्यता

Kolkata Rape & Murder Case | शविविच्छेदन अहवालातून माहिती; कुटुंबीयांचा दावा
Kolkata Rape and Murder Case
कोलकता येथील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर देशभरात निदर्शने होत आहेत. ANI X post
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकता येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. पीडितेच्या शवविच्छेदन अहवालातून हा प्रकार सामूहिक बलात्काराचा असू शकतो, असे दिसून येत आहे. पीडित तरुणीच्या शरीरात १५० मिलिग्रॅम इतके विर्य मिळून आले आहे, हे प्रमाण लक्षात घेता या बलात्कार प्रकरणात एकापेक्षा जास्त आरोपींचा सहभाग असू शकतो. (Kolkata Rape & Murder Case)

ही बाब पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. उच्च न्यायलयाने मंगळवारी या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवला आहे. या संदर्भातील वृत्त NDTVने दिलेले आहे.

कुटुंबीयांनी म्हटले आहे की, "शवविच्छेदन अहवालात आमच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची बरीच सविस्तर माहिती मिळते. तिच्या शरीरावर जखमांच्या बऱ्याच खुणा आहेत." मुलीच्या दोन्ही कानावर जखमा आहेत तसेच ओठांवरही गंभीर जखमा दिसून आल्या आहेत, यातून पीडितेला जबर मारहाण झाल्याचे दिसून येते. (Kolkata Rape & Murder Case)

कुटुंबीयांच्या याचिकेत म्हटले आहे की, "मुलीच्या शरीरात १५० मिलिग्रॅम इतके विर्य आढळून आल्याचे शवविच्छेदन अहवाल सांगतो. हे प्रमाण लक्षात घेता आरोपींची शक्यता एकापेक्षा जास्त असल्याचे लक्षात येते."

Kolkata Rape & Murder Case | CBIचा तपास सुरू

या प्रकरणात संजोय रॉय या नागरी सुविधा पुरवणाऱ्या व्यक्तीला अटक झाली आहे. पण अजून इतर कोणालाही यात अटक झालेली नाही. पीडितेच्या कुटुंबीयांनी हा घटनेत तीन आरोपी आहेत, असाही दावा केला आहे.

या प्रकरणाचा तपास आता CBIने हाती घेतलेला आहे. CBIच्या टीममध्ये मेडिकल आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट आहेत. तसेच आरोपी संजोय रॉय आता CBIच्या कस्टडीमध्ये आहे.

Kolkata Rape and Murder Case
Kolkata Doctor Rape-Murder Case : कोलकातामध्ये बलात्कारानंतर रुग्णालयात डॉक्टर तरुणीची निर्घृण हत्या

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news