पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचे सत्र सुरु झाले आहेत. राज्यातील काही ठिकाणी नुकत्याच झालेल्या ड्रोन हल्ल्यांतील दोषींवर कारवाई करावाईच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. मागील आठवड्यापासून सुरु असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १२ जण ठार झाले आहेत. तीन जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. तसेच पाच जिल्ह्यांमध्ये पाच दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
नुकत्याच झालेल्या ड्रोन हल्ल्यांतील दोषींवर कारवाई करा, अशी मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत.विविध शाळा आणि महाविद्यालयांतील शेकडो विद्यार्थ्यांनी सोमवारी इम्फाळमधील खवैरामबंद येथे आंदोलन केले होते.
गेल्या आठवड्यात 12 जणांच्या मृत्यूनंतर मणिपूर राज्यातील तणाव कायम आहे. मणिपूरच्या तीन जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. मणिपूरमधील पाच जिल्ह्यांमध्ये पाच दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. राज्यातील अशांतता लक्षात घेऊन उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १२ सप्टेंबरपर्यंत सर्व शासकीय, शासकीय अनुदानित आणि खासगी महाविद्यालये बंद ठेवली आहेत.
कांगपोकपी आणि पश्चिम इंफाळवरील गामगीफई नावाने ओळखल्या जाणार्या भागात आसाम रायफल्स , सीआरपीएफ आणि मणिपूर पोलिस कमांडोकडून नाक्यावर नियमित तपासणी केली जात आहे.परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, अशी माहिती सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षणक मनीष कुमार सच्चर यांनी ANI शी बोलताना दिली.