India@75 : भारतीय क्रिकेटपटूंच्या ‘या’ विक्रमी कामगिरीने ‘तिरंगा’ फडकला मानाने | पुढारी

India@75 : भारतीय क्रिकेटपटूंच्या ‘या’ विक्रमी कामगिरीने ‘तिरंगा’ फडकला मानाने

पुढारी ऑनलाईन डेस्क : India at 75 Cricket Records : भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. हा विशेष सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी देशभरात अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या 75 वर्षांच्या प्रवासात क्रीडा विश्वातही भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीने देशाचे नाव रोशन केले आहे. क्रिकेटमध्ये भारतीय संघाने अविस्मरणीय कामगिरीने एक वेगळीच उंची गाठली. भारतीय खेळाडूंनी अनेक विक्रम केले आहेत जे मोडणे जवळपास अशक्यच आहे. चला जाणून घेऊया अशाच काही विकामांबद्दल….

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके

विराट कोहली सचिनच्या 100 शतकांचा विक्रम मोडेल अशी अशा केली जात होती. पण आता विराटचा गेल्या दोन अडीच वर्षांपासून खराब आहे. इतक्या मोठ्या कालावधीत तो शतकी खेळीपर्यंत मजल मारू शकलेला नाही. त्यातच त्याच्याकडे आता क्रिकेट खेळण्यासाठी कमी वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे सचिनच्या 100 शतकांचा विक्रम अबाधित राहिल यात शंका नाही. (india at 75 cricket records)

Sachin Tendulkar unveils his all-time best playing XI, no place for Virat Kohli and MS Dhoni

एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्तम धावसंख्या

सध्याचा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. 2014 मध्ये रोहितने श्रीलंकेविरुद्ध ईडन गार्डन्स मैदानावर 264 धावांची धडाकेबाज इनिंग खेळली होती. रोहितच्या या सर्वोच्च धावसंख्येपर्यंत पोहोचणे कोणत्याही फलंदाजासाठी कठीण आहे. रोहितनंतर न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल 243 धावांसह या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Rohit Sharma's Exclusion From Australian Tour Raises Eyebrows; Fans Blame BCCI And Virat Kohli

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 664 सामन्यांमध्ये 34357 धावा केल्या आहेत. या बाबतीत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा 28016 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सक्रिय खेळाडूंच्या नावावर विराट कोहलीच्या नावावर 23726 धावा आहेत, मात्र सचिनच्या विक्रमापर्यंत पोहोचणे कोहलीलाही शक्य नाही. (india at 75 cricket records)

Sachin Tendulkar 9/2 with Sky Bet to score a century in final Test | Cricket News | Sky Sports

सलग निर्धाव षटके टाकण्याचा विक्रम

भारतीय गोलंदाज बापू नाडकर्णी यांच्या नावावर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक अद्भुत विक्रमाची नोंद आहे. एका कसोटीत सलग 131 चेंडूत एकही धाव न देण्याचा विक्रम डावखुरे फिरकी गोलंदाज बापूंच्या नावावर आहे. यादरम्यान त्यांनी सलग 21 निर्धाव षटके टाकली. बापू नाडकर्णी यांनी 1964 मध्ये इंग्लंडविरुद्ध मद्रास कसोटी सामन्यात हा पराक्रम केला होता. कसोटी क्रिकेटचा सध्याचा पॅटर्न पाहता बापू नाडकर्णी यांचा विक्रम क्वचितच कोणीही मोडू शकेल.

The Man Who Time Forgot - Bapu Nadkarni - He Once Bowled 21 Consecutive Maiden Overs In A Test Match

कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना ‘द वॉल’ या नवाने ओळखले जाते. राहुल द्रविडने आपल्या 16 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत 164 सामन्यांमध्ये 31258 चेंडूंचा सामना केला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. या यादीत सचिन तेंडुलकर 29437 चेंडूंसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. (india at 75 cricket records)

Rahul Dravid made me feel like an 11-year-old spinner: Graeme Swann - Sports News

सर्वाधिक स्टंपिंग

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंपिंग करण्याचा विक्रम भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावावर आहे. धोनीने 538 सामन्यात एकूण 195 स्टंपिंग केले. श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकारा (139) आणि रोमेश कालुवितरना (101) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.(india at 75 cricket records)

MS Dhoni creates world record, completes 100 stumpings in ODIs

Back to top button