पुढारी ऑनलाईन डेस्क : राजधानी दिल्लीतील आश्रमाजवळ मर्सिडीज कारने दिलेल्या धडकेत ३४ वर्षीय सायकलस्वार मृत्यू झाला. याप्रकरणी कारवाई करत दिल्ली पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून आरोपी चालकाला ताब्यात घेतले आहे. ही घटना शनिवारी (दि.१७) सकाळी घडली. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे. (Delhi Hit and Run Case)
माहितीनुसार, शनिवारी (दि.१७) सकाळी भरधाव वेगात आलेल्या मर्सिडीजने आश्रमाजवळ दुचाकीस्वार तरुणाला धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी कारसह पळून गेले. राजेश असे मृत तरुणाचे नाव आहे. राजेश शनिवारी सकाळी कामावर जात असताना भोगल उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला.
मागून भरधाव येणाऱ्या कारने त्याला धडक दिल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. राजेश हा मूळचा उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील आहे. त्याला दोन मुले आहेत. तो दक्षिण पूर्व दिल्लीतील जोरबाग भागात माळी म्हणून काम करत होता. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.