दिल्लीतून दोन हजार कोटी रुपयांचे कोकेन जप्त

रमेशनगर भागातून दिल्ली पोलिसांकडून 200 किलो ड्रग्ज जप्त
Cocaine worth Rs 2000 Crore seized in Delhi
दिल्लीमध्ये दोन हजार कोटी रुपयांचे कोकेन जप्तPudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्लीतून २ हजार कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. सुमारे २०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रमेश नगर भागातील एका गोदामातून ते जप्त केले. यासह आतापर्यंत ७ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

Cocaine worth Rs 2000 Crore seized in Delhi
Nashik Crime Update | ब्रेकिंग ! 'छोटी भाभी' ड्रग्ज प्रकरणात दोघे गजाआड

दुबईत उपस्थित भारतीय नागरिक वीरेंद्र बसोया याचे नाव आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा मास्टरमाईंड म्हणून समोर आले आहे. बसोयाला यापूर्वीच भारतात ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र जामीन मिळाल्यानंतर तो दुबईला गेला आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेलचा मोठा माफिया बनला. ५ हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज सिंडिकेटचा मास्टरमाईंड आणि मुख्य आरोपी तुषार गोयल आणि वीरेंद्र बसोया हे जुने मित्र असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news