पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI - Central Bureau of Investigation) आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष (Sandip Ghosh) यांच्याविरुद्ध त्यांच्या कार्यकाळात संस्थेतील कथित आर्थिक अनियमिततेच्या चौकशीच्या संदर्भात एफआयआर नोंदवला आहे. सीबीआयने संदीप घोष यांच्यावर (Ex-principal Sandip Ghosh) अजामीनपात्र कलमही लावले आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने एफआयआरमध्ये आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचे नाव नोंदवले आहे. माहितीनुसार, केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांच्या कार्यकाळात संस्थेतील कथित आर्थिक अनियमिततेच्या तपासासंदर्भात एफआयआर नोंदवला आहे. त्यांच्यावर कलम ४२० IPC (फसवणूक आणि अप्रामाणिकता) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ (२०१८ मध्ये सुधारित केल्यानुसार) च्या कलम ७ सोबत आयपीसीचे कलम १२0B (गुन्हेगारी कट) लागू करण्यात आले आहे.