प्रकाशम : महिलेने प्रियकरावर चाकूने हल्ला करून त्याचे गुप्तांग जखमी केल्याची घटना आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात ही घटना घडली आहे. विजय कुमार यादव असे पीडिताचे नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे.
गेल्या चार महिन्यांपासून तो सीता कुमारी नावाच्या महिलेसह लिव्ह इनमध्ये राहात होता. पत्नी आपल्यासोबत राहात नसल्याने विजय कुमार हा कमावलेले सर्व पैसे तिला पाठवत होता. यामुळे सीता कुमारी नाराज झाली होती. या रागातून तिने त्याचे डोळे, हात बांधले व मोबाईल काढून घेतला आणि नंतर गुप्तांगावर हल्ला केला.
विजय कुमार यादव आपली योग्य काळजी घेत नसल्याचा आरोप सीता कुमारीने केला आहे. यामुळेच तो झोपेत असताना तिने त्याच्यावर हल्ला केला. उदरनिर्वाहासाठी विजय तोरागुडीपाडू गावात दुग्धव्यवसाय करत होता. विजय आणि सीता हे दोघेही बिहारचे रहिवासी आहेत. या घटनेने हादरलेल्या पोलिसांनी सीता कुमारीला ताब्यात घेतले आहे.