ऑनलाइन पासपोर्ट काढताय? जाणून घ्या पुढील ४ दिवसांसाठी झालेला बदल

Passport Seva Portal : ऑनलाइन पासपोर्ट सेवा पोर्टल बंद राहणार?
Passport Seva Portal
ऑनलाइन पासपोर्ट सेवा पोर्टल बंद राहणार, जाणून घ्या कारण File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत सरकारचे ऑनलाइन पासपोर्ट सेवा पोर्टल (Passport Seva Portal) आजपासुन (दि.२९) पुढील चार दिवस बंद राहील. सर्व भेटींचे वेळापत्रक पुन्हा निश्चित केले जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

पुन्हा वेळापत्रक जाहीर?

परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, पासपोर्ट अर्जांसाठीचे ऑनलाइन पासपोर्ट सेवा पोर्टल पुढील चार दिवस देखभाल कार्यासाठी बंद राहील. परिणामी, या कालावधीत कोणत्याही नव्या भेटीची वेळ निश्चित केली जाऊ शकत नाही, असे निवेदनात म्हटले आहे. तथापि, आधीच बुक केलेल्या अपॉइंटमेंट्स यांचे पुन्हा वेळापत्रक जाहीर केले जावू शकते.(Passport Seva Portal)

किती दिवस राहणार बंद?

ऑनलाइन पासपोर्ट सेवा पोर्टल भारतीय प्रमाणवेळेनुसार २९ ऑगस्ट २०२४, गुरुवार रात्री आठ पासून ते २ सप्टेंबर, सोमवार सहा पर्यंत तांत्रिक देखरेखीसाठी बंद असेल. या कालावधीत नागरिकांसाठी आणि सर्व MEA/RPO/BOI साठी यंत्रणा उपलब्ध नसेल. /ISP/DoP/पोलीस प्राधिकरणे यांसाठी ३० ऑगस्ट २०२४ साठी आधीच बुक केलेल्या अपॉइंटमेंट्स यांचे योग्यरित्या पुन्हा वेळापत्रक जाहीर केले जाईल. त्यानंतर अर्जदारांना कळवल्या जातील.

सार्वजनिक गैरसोय दूर करण्यासाठी सार्वजनिक गैरसोय दूर करण्यासाठी आकस्मिक यंत्रणा तयार केल्या गेल्या आहेत

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news