

पाटणा : बिहारमधील विधानसभा निवडणूक ही जनतेसमोर ‘मोदी-नितीश जोडी,’ जी बिहारचा विकास करेल आणि राजदच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष, जो ‘जंगलराज परत आणेल,’ यांच्यातील निवडीचा पर्याय आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल चढविला.
गोपालगंज आणि समस्तिपूर येथील सभांना दूरद़ृश्यप्रणालीद्वारे संबोधित करताना शहा म्हणाले की, विरोधी पक्ष सत्तेत आल्यास ‘जंगलराज’ परत येईल. ही निवडणूक बिहारचे भविष्य कोणाच्या हाती सोपवायचे हे ठरवण्याची संधी आहे. एकीकडे जंगलराज आणणारे आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची जोडी आहे, ज्यांनी विकास आणला आहे, असे ते म्हणाले.
2002 पासून राजदला कधीही मतदान केलेले नाही. मला खात्री आहे की, ते हाच कल कायम ठेवतील... साधू यादव यांचे कारनामे गोपालगंजच्या लोकांपेक्षा जास्त चांगले कोणीही जाणत नाही, असेही ते म्हणाले.