पुढारी ऑनलाईन डेस्क: बांगला देशमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी सोमवार (दि.५ ऑगस्ट) पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी देश सोडला असून, त्या अद्याप भारतात सुरक्षितस्थळी असल्याचे समजते. बांगलादेशच्या या मुद्द्यावर केंद्र सरकारने तातडीने आज (दि. ६ ऑगस्ट) सकाळी १० वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली असून, बैठक सुरू झाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
बांगला देशच्या मुद्द्यावर संसदेत सर्वपक्षीय बैठक आज (दि.६ जुलेै) सकाळी १० वाजता सुरू झाली आहे. दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर हे विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांना माहिती देत असल्याचा व्हिडिओ एएनआयने शेअर केला आहे.
बांगला देशमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. सरकारने बोलवलेल्या या बैठकीला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी एस. जयशंकर बांगला देशच्या परिस्थितीची माहिती देणार आहेत. या बैठकीला दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते, राहुल गांधी (लोकसभा) आणि मल्लिकार्जुन खरगे (राज्यसभा) बांगलादेशच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.