Air Pollution | खुशखबर ! वायू प्रदूषण १९.३ टक्क्यांनी घटले !

भारतीयांचे आयुर्मान ५१ दिवसांनी वाढले; शिकागो विद्यापीठाच्या संशोधनातील निष्कर्ष
Air pollution
air pollutionFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

जगातील सगळे देश वायू प्रदूषणामुळे त्रस्त झालेले असताना भारतीयांसाठी खुशखबर आली आहे. २०२२ मध्ये भारतातील वायू प्रदूषण १९.३ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे भारतीयांचे आयुर्मान ५१ दिवसांनी वाढले असल्याचा निष्कर्ष शिकागो विद्यापीठाने केलेल्या अभ्यासातून पुढे आला आहे. (Air Pollution)

प्रदूषण घटविण्यात भारताचा बांगला देशनंतर दुसरा क्रमांक लागतो. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी संस्थेने २०२१ आणि २०२२ मधील जागतिक वायू प्रदूषणाचा अभ्यास केला. याबाबतचा 'एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स २०२४' हा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला.

त्यात जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आखून दिलेल्या वार्षिक मयदिपेक्षा (प्रतिक्युबिक मीटर ५ मायक्रोग्रॅम) जास्त वायू प्रदूषण असल्यामुळे याचा फटकाही भविष्यात सहन करावा लागू शकतो. सर्वच दक्षिण आशियाई देशांमधील वायू प्रदूषण कमी झाल्याचा निष्कर्ष या अहवालातून समोर आला आहे.

२०२२ मध्ये पीएम २.५ चे (पार्टिकल मॅटर्स) प्रमाण भारतात प्रतिक्युबिक मीटर ९ मायक्रोग्रॅम इतके होते. हे प्रमाण २०२१ च्या तुलनेत १९.३ टक्क्यांनी कमी आहे. पश्चिम बंगालच्या पुरुलिया आणि बांकुरा जिल्ह्यांत हे प्रदूषण सर्वात कमी झाले.

त्यापाठोपाठ झारखंडमधील धनबाद, पुरबी, पश्चिम सिंगभूम, मिदनापूर आणि बोकारो जिल्ह्यांतील प्रदूषण घटले. यातील प्रत्येक जिल्ह्यात हवेतील पीएम २.५ हा घटक प्रतिक्युबिक मीटर २० मायक्रोग्रॅमने घटला. देशातील उत्तर पठार सर्वात प्रक्षित मानले जाते. तेथील वायू प्रदूषण २०२१ च्या तुलनेत तब्बल १७.२ टक्क्यांनी घटल्याचे अहवालात म्हटले.

राजकीय इच्छाशक्ती आवश्यक

या अहवालावर ग्रीनपीस संस्थेचे प्रचार व्यवस्थापक अविनाश चंचल म्हणाले, अजूनही जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार आपल्या देशातील हवेचा दर्जा खालावलेला आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी प्रदूषण घटविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपल्याकडे त्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान आणि साधनेही आहेत; पण त्याचा वापर करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम राबविला जातो, तेथील प्रदूषण १९ टक्क्यांनी घटले, तर जेथे या कार्यक्रमाचा अभाव आहे, तेथील प्रदूषण १६ टक्क्यांनी घटले, असेही शिकागो विद्यापीठाच्या या अहवालात म्हटले आहे. हा कार्यक्रम २०१९ पासून राबविला जातो. त्याद्वारे २०२४ पर्यंत प्रदूषण २०१७ च्या तुलनेत २० ते ३० टक्के घटविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आता २०२६ पर्यंत ४० टक्के प्रदूषण घटविण्याचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमांतर्गत १३१ प्रदूषित शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news