गोवा कोरोना : काॅर्डेलिया क्रूझवर ६६ प्रवाशी कोरोना पाॅझिटिव्ह | पुढारी

गोवा कोरोना : काॅर्डेलिया क्रूझवर ६६ प्रवाशी कोरोना पाॅझिटिव्ह

पुढारी ऑनलाईन डेस्क

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आलेली काॅर्डेलिया क्रूझ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण, यावेळी ही क्रूझ वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. कारण, मुंबईहून गोवा राज्याकडे जाणाऱ्या या क्रूझवर २००० प्रवाशी होते, त्यांच्यापैकी एकाच वेळी तब्बल ६६ जणांना कोरोनाचं संक्रमण झालेलं आहे. यामध्ये क्रूझच्या चालक टीममधील एक जण कोरोना पाॅझिटिव्ह सापडलेला आहे.

गोवा राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले की, “चालक टीममधील एका सदस्याची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आल्यामुळे सर्व प्रवाशांची टेस्ट करण्यात आली आहे. त्यातमध्ये ६६ प्रवाशांचा कोरोनाचा रिपोर्ट हा पाॅझिटिव्ह आलेला आहे. हे प्रवाशी मुंबईहून गोव्याकडे निघाले होते. मुंबईतून गोव्यात पोहोचल्यानंतर या जहाजाला रविवारी समुद्रातच थांबविण्यात आले. त्यानंतर सर्वांच्या टेस्ट केल्यानंतर प्रवाशांना जाऊन दिले.

विश्वजीत राणे म्हणाले की, “कोर्डेलिया क्रूझ या जहाजावरून परिक्षणासाठी २००० नमुने पाठविण्यात आले होते. त्यात ६६ जणांचे रिपोर्ट कोरोना पाॅझिटिव्ह आलेले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि एमपीटी (मोरमुआगो पोर्ट ट्रस्ट)च्या कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पण, ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे, त्यांना सरकारच्या पुढील सुचना मिळेपर्यंत थांबवं लागणार आहे.

सोमवारी गोवा राज्यात कोरोना व्हायरच्या नव्या व्हेरियंटच्या अर्थात ओमायक्राॅनच्या चार केसेस समोर आलेल्या आहेत. या चौघा प्रवाशांपैकी कुणाचाही पूर्वीच्या आरोग्य अहवालात कोरोनाची लागण झाल्याचे दिसलेले नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला चिंता लागेलेली आहे की, राज्यात ओमायक्राॅनच्या व्हेरियंटचा प्रसार सुरू झालेला आहे.

Back to top button