पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, औषधे, ऑक्सिजनचा साठा ठेवा - पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, औषधे, ऑक्सिजनचा साठा ठेवा

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : देशातील औषधे तसेच वैद्यकीय द्रव्यरूप ऑक्सिजनचा (एलएमओ) मुबलक साठा ठेवण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत दिले.

कोरोनाच्या नवा व्हेरियंटचा धोका उद्भवल्यानंतर पंतप्रधानांनी दुसर्‍यांदा बैठक घेतली. यापूर्वी 28 नोव्हेंबरला त्यांनी बैठक घेतली होती. रुग्ण सहवासितांचा शोध घेणे, चाचण्या वाढवणे आणि लसीकरण या त्रिसूत्रीवर पंतप्रधानांनी भर दिला. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीकरणाची स्थिती समाधानकारक नाही,

अशा जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देशही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. कोरोना परिस्थितीचा सक्षम सामना करण्यासाठी केंद्राकडून राज्यांसोबत आखण्यात आलेल्या संयुक्‍त उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना यावेळी देण्यात आली.

आज नवे नियम

मुंबई : रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना टास्क फोर्सची बैठक घेत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कसे निर्बंध लावता येतील यावर चर्चा केली. गर्दी रोखण्यासाठी लग्न, पार्ट्या, हॉटेल्स आणि उपाहारगृहे यांच्यासाठी नवी नियमावली शुक्रवारी 24 डिसेंबर रोजी जाहीर करण्याचा निर्णय या बैठकीत झाला.

Back to top button