बंगळूर : पुढारी ऑनलाईन डेस्क
जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉनची दहशत वाढत असताना कर्नाटकातून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कर्नाटकातील तिसऱ्या ओमायक्रॉन रुग्णाला नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. विशेष म्हणजे या रुग्णाला याआधी दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरियंटची लागण झाली होती. त्याने आधी डेल्टा व्हेरियंटवर आणि आता त्याने ओमायक्रॉन व्हेरियंटवर मात केली आहे. त्याने लसीचे दोन डोस घेतले आहेत. ओमायक्रॉन मधून बरा झाल्यानंतर स्वतः या रुग्णाने आपला अनुभव शेअर केला आहे.
त्याने आपले नाव उघड केलेले नाही. ३४ वर्षाच्या या रुग्णाला दुसऱ्या लाटेत एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्याने लसीचे दोन डोस घेतले होते. तरीही त्याला दोनदा कोरोनाची लागण झाली. दक्षिण आफ्रिकेत काम करत असताना त्याला संसर्ग झाला होता. पण, ओमिक्रॉन व्हेरियंट पेक्षा डेल्टाचा संसर्ग झाला तेव्हा मला जास्त त्रास झाला होता, असे त्याने म्हटले आहे.
"ओमायक्रॉनची लागण झाल्यानंतर घसादुखी, खोकला आणि थकवा अशी लक्षणे दिसून आली. ओमिक्रॉनवर स्वतंत्र असे उपचार केले जात नाहीत. व्हिटॅमिन-सी च्या गोळ्या आणि antibiotics देण्यात आली. लक्षणे खूप सौम्य असल्याने एक आठवडा हॉस्पिटलच्या वॉर्डमधूनचे ऑफिसचे कामाचे सांभाळले," असे तो म्हणतो.
दरम्यान, बंगळूरमधील एक डॉक्टरला ओमायक्रॉनबाधित झाला होता. तोदेखील यातून बरा झाला आहे.
जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची धास्ती आहे. याआधी डेल्टा व्हेरियंट वेगाने पसरला होता. डेल्टाचा फुफ्फुसावर होणारा संसर्ग अधिक होता. यामुळे दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण अधिक होते. आता कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिंयंटबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट हवेतून वेगाने पसरतो पण फुफ्फुसाला संसर्ग होण्याचा धोका कमी आहे, असे एका प्राथमिक स्वरुपातील संशोधनातून आढळून आले आहे.
कोरोनावरील हे संशोधन आहे. पण त्यातील निष्कर्षांची पुष्टी अद्याप झालेली नाही. कोरोना विषाणूत वारंवार बदल करतो. त्यामुळे या निष्कर्षात बदलही होऊ शकतो. ओमायक्रॉन आणि कोरोना विषाणूची इतर रूपे किती कार्यक्षमतेने गुणाकार करतात. यातील फरक ओमायक्रॉनच्या परिणामांचा अंदाज लावण्यास मदत करू शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :