कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतारानंतर देखील इंधन दर स्थिर | पुढारी

कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतारानंतर देखील इंधन दर स्थिर

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होत असताना देखील देशात इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. मागील महिनाभरापासून इंधन कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी कच्च्या तेलाचे दर कमी झाले असले तरी इंधन कंपन्यांनी दरात कपात केली नाही.

राजधानी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या महानगरांमध्ये शनिवारी देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिलेत. दिल्लीत पेट्रोलचा दर ९५.४१ प्रतिलीटर आणि डिझेलचा दर ८६.६७ प्रतिलीटर आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे १०९.९८ प्रतिलीटर आणि ९४.१४ प्रतिलीटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १०४.६७ रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर ८९.७९ रुपये प्रतिलीटर तर कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे १०१.४० रुपये आणि ९१.४३ रुपये आहेत.

देशात सर्वात महागडे पेट्रोल गंगानगरमध्ये विकले जात आहे. शहरात ११२.११ रूपये लिटर प्रमाणे पेट्रोलची विक्री केली जात आहे. तर, सर्वाधिक स्वस्त पेट्रोल पोर्टब्लेयर मध्ये विकले जात आहे. येथे ८२.९६ रूपये लिटर दराने पेट्रोचली विक्री केली जात आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button