Uttarakhand accident:उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग टेम्पो ट्रॅव्हलर अपघातातील मृतांचा आकडा १२

Uttarakhand accident
Uttarakhand accident
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: रुद्रप्रयागमधील बद्रीनाथ महामार्गाजवळ चार धाम यात्रेला निघालेल्या २३ यात्रेकरूंनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर  अलकनंदा नदीत कोसळली. या भीषण अपघातातील मृतांचा अकडा १२ पर्यंत पोहचला आहे. वाहनातील २३ प्रवाशांपैकी काहींना वाचवण्यात आले असून, त्यांना नजिकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. (Uttarakhand accident)

रुद्रप्रयाग टेम्पो ट्रॅव्हलर अपघातातील मृतांची संख्या १२ वर पोहोचली आहे. तसेच या दुर्घटनेत १४ जण जखमी झाले आहेत, अशी अपडेट राज्य आपत्ती व्यवस्थापणाने दिली आहे.

या अपघाता संदर्भात माहिती देताना, गढवालतचे पोलिस महानिरीक्षक करण सिंह नागन्याल यांनी सांगितले की, "टेम्पो ट्रव्हलर उत्तर प्रदेशातील नोएडा येथून रूद्रप्रयागच्या दिशेने जात होती. ती १५० ते २०० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ९ जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. तर चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्तात म्हटले आहे. (Uttarakhand accident)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news