अयोध्या : (वृत्तसंस्था) जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी शुक्रवारी दिली.
या धमकीनंतर तपास यंत्रणानी अलर्ट जारी केला आहे. राम मंदिर परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
'जैश' या दहशतवादी संघटनेच्या आमीर नामक दहशतवाद्याने धमकीचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. यामध्ये अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी दिली आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर मशीद होती. मशीद पाडून राम मंदिर बांधण्यात आले आहे. आमचे तीन साथीदार आतापर्यंत मारले गेले आहेत. त्यामुळे राम मंदिर उडवून देणार आहोत, असे या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
* तपास यंत्रणांकडून अलर्ट जारी
* मंदिर, विमानतळासह महत्त्वाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त
* सीसीटीव्हीद्वारे संशयास्पद हालचालींवर नजर