‘सीमा हैदर,चार मुलं परत कर’: पतीची बाल हक्क आयोगाकडे धाव

File photo
File photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन ; पाकिस्‍तानमधून अवैद्यरित्‍या भारतात आलेल्‍या सीमा हैदरच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. तिचा पती गुलाम हैदर यांने चार मुलांना परत मागितले आहे. यासाठी त्‍यांनी तिथल्‍या राष्‍ट्रीय बाल हक्‍क आयोगाने भारताच्या परराष्‍ट्र मंत्रालयाला पत्र पाठवले आहे. सीमा हैदरने तिच्या चार मुलांना त्‍यांच्‍या वडिलांकडे परत साेपवावे, अशी मागणी करणारे पत्र पाकिस्तानच्या राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिले आहे.

पाकिस्‍तानी माध्यमांच्या वृत्‍तानुसार, सीमा हैदरचा पती गुलाम हैदर हा सध्या पाकिस्‍तानमध्येच वास्‍तव्यास आहे. न्यूज एजन्सी ANI ने म्‍हटलंय की, पाकिस्‍तान बाल अधिकार आयोग (NCRC) ने सीमा हैदरच्या चार मुलांना तात्‍काळ पाकिस्‍तानात आणण्याची मागणी केली आहे. सीमा ही तीचा प्रेमी सचिन मीणा याच्यासोबत लग्‍न करण्यासाठी नेपाळ मार्गे अवैद्यरित्‍या भारतात आली होती. याआधी सीमा हैदरचा पती गुलाम हैदरने देखील पंतप्रधान मोदी यांना मुलांना परत देण्याची मागणी केली होती. इतकेच नाही तर गुलामने पाकिस्‍तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना मुले परत आणण्यासाठी व्हिडिओ मेसेज केला होता.

पबजी खेळताना सीमाची सचिनशी झाली हाेती मैत्री

पाकिस्‍तानी नागरिक सीमा हैदरची मैत्री ग्रेटर नोएडात राहणाऱ्या सचिन मीणा याच्याशी झाली. पबजी खेळता-खेळता सुरूवातीला त्‍यांच्यात मैत्री झाली. सीमा हैदरचा पती मुलाम हैदर हा दुबईमध्ये नोकरी करतो. दरम्‍यान सीमा आणि सचिन यांच्यातील मैत्रिचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर त्‍यांनी लग्‍न करण्याचा निश्चय केला. त्‍यासाठी सीमा हैदर पाकिस्‍तान सोडून नेपाळमार्गे मुलांना घेवून अवैद्यरित्‍या भारतात आली. सीमा हैदर ही गेल्‍या वर्षी मे महिण्यात नेपाळहून अवैद्यरित्‍या भारतीय सीमेत आली होती. यानंतर ती सचिन मीणा याच्यासोबत ग्रेटर नोएडा येथील त्‍याच्या घरात राहू लागली.

राहते घर विकून सचिनकडे आली सीमा

गुलाम हैदरने सागितले की, सीमाच्या सांगण्यावरूनच मी सौदी अरब मध्ये पैसे कमावण्यासाठी गेलो होतो. मुलांचे चांगले संगोपन व्हावे आणि त्‍यांना चांगले शिक्षण देता यावे यासाठी मी हा निर्णय घेतला होता. तिथून मी सीमाला ४० ते ५० हजार रूपये महिण्याला पाठवत असे. नंतर मी तीला ८० ते ९० हजार रूपये महिण्याला पाठवत होतो. मी तीला घर खरेदी करण्यासाठी १३ लाख रूपये देखील पाठवले होते. सीमाने घर खरेदीही केले होते. मात्र यानंतर तीने ते घर विकुन सचिनकडे निघुन गेली. एवढच नाही तर, सीमाने घर विकल्‍याची गोष्‍ट मान्यही केली आहे.

गेल्‍या वर्षी केली होती अटक

जेंव्हा या गोष्‍टीची माहिती पोलिस आणि तपास यंत्रणांना झाली तेंव्हा सीमा हैदरला व्हिजा शिवाय भारतात प्रवेश केल्‍याच्या प्रकरणात ४ जुलै २०२३ रोजी अटक करण्यात आली होती. तसेच अवैद्य प्रवाशांना शरण दिल्‍याच्या आरोपांखाली सचिनलाही तुरूंगात पाठवण्यात आले होते. मात्र नंतर या दोघांचीही सुटका करण्यात आली. यानंतर सचिन सीमा हे दोघेही एकत्र राहू लागले. त्‍यांनी एकमेकांसोबत लग्‍नही केले. सीमाने सचिनसाठी करवा चौथचे व्रतही ठेवले. तीचे पूजा करतानाचे व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल झाले होते. तसेच तीची ननंद आणि सासू सोबतचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news