पुढारी ऑनलाईन डेस्क: आज सकाळी ८ वाजेपासून १८ व्या लोकसभा निवडणूक मतमोजणीला सुरूवात झाली आहे. मतमोजणीचे पहिल्या टप्प्यातील कल समोर आले असून, काँग्रेसचे उमेदरवार राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून आघाडीवर (Lok Sabha Election 2024) आहेत.
राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून २१२६ मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत. तर केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून ८७१८ मतांनी आघाडीवर (Lok Sabha Election 2024) आहेत.
काँग्रेसचे लोकसभा उमेदवार राहुल गांधी वायनाड (केरळ) लोकसभा आणि रायबरेली ( उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. वायनाडमध्ये राहुल गांधी भाजप केरळचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्याविरूद्ध लढत आहेत. तर रायबरेलीमध्ये भाजपचे दिनेश प्रताप सिंग यांच्याविरुद्ध राहुल गांधी अशी लढत आहे.