La Nina : भारतात ‘ला निना’मुळे थंडी वाढणार! काय आहे ‘ला निना’? | पुढारी

La Nina : भारतात 'ला निना'मुळे थंडी वाढणार! काय आहे 'ला निना'?

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या ‘ला निना’मुळे (La Nina) उत्तर भारतात कडक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. ‘ला निना’चा हंगामी पॅटर्न उत्तर ध्रुवावरील थंडीचं कारण होऊ शकतो. यामुळेच भारताच्या काही भागांत जास्तीत जास्त कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता जास्त आहे.

ब्लुमबर्गच्या अहवालानुसार जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत उत्तर भारताच्या काही राज्यांत विशेष करून मोठ्या प्रमाणात थंडी पडणार असून ३ अंश सेल्सियसपर्यंत तापमान घसरू शकते. या अहवालात असं सांगितलं आहे की, ‘ला निना’मुळे पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे आशिया खंडातील देशांमध्ये ऊर्जा संसाधनाचे संकट निर्माण होऊ शकतो. या संकटाचा खरा सामना चीनला करावा लागू शकतो. कारण, ऊर्जा संसाधनाचा सर्वात जास्त वापर करण्याऱ्या देशांच्या यादीत चीन प्रथम स्थानावर आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना या सर्व घडामोडी घडत आहे.

अन्य देशांच्या तुलनेत भारतात ऊर्जेचा वापर कमी केला जातो. कारण, थंडीमध्ये एअर कंडिशनरचा वापर खूप कमी केला जातो. ‘ला निना’चा प्रभाव सध्या भारतात जाणवू लागला आहे. कारण, भारतातील अनेक राज्यांचा काही भागांत मुसळधार प्रमाणात पाऊस पडत आहे. विशेष करून उत्तर भारतात उत्तराखंड आणि दक्षिण भारतात केरळ राज्यात त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. सध्या जो पाऊस उशिरापर्यंत थांबलेला आहे, त्यामागे ‘ला निना’ हे कारण आहे. हिमाचल प्रदेश आणि आसपासच्या भागात शून्य अंश सेल्सियसपर्यंत तापमान घसरल्याची नोंद झाली आहे.

Rain

‘ला निना’चा अर्थ काय आहे?

स्पॅनिश भाषेत ‘ला निना’ या शब्दाचा अर्थ लहान मूल असा होतो. नॅशनल ओशनिक सर्व्हिस ऑफ नॅशनल ओशनिक एण्ड एटमाॅस्पेरिक एडमिनिस्ट्रेशन (NIAA) यांच्या म्हणण्यानुसार ‘ला निना’ला एल-विएजो किंवा एंटी-एल निनो, असं म्हंटलं जाऊ शकते. ‘ला निना’ला चक्र म्हणूनही ओळखले जाते आणि प्रशांत महासागरावर नैसर्गिकपणे उद्भवणाऱ्या वातावरणाचा भाग आहे. ३ ते ७ वर्षांनंतर ‘ला निना’ परिस्थिती निर्माण होत राहते.

‘ला निना’मुळे वातावरणात नेमकं होतं काय?

अमेरिकन जिओसायन्स इन्स्टिट्यूटनुसार ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ या (La Nina) शब्दांचा अर्थ प्रशांत महासागरात समुद्री तापमानामध्ये वेळोवेळी बदल होतो. त्या बदलाचा परिणाम संपूर्ण जगावर होतो. एल निनोमुळे तापामन वाढतं तर, ला निनामुळे तापमान घटतं म्हणजे थंडी वाढते. त्याचा परिणाम साधारणपणे किमान १ ते २ वर्षांपर्यंत राहतो.

‘ला निना’मुळे वातावरणात कोणते परिणाम होतात?

चक्रीवादळावर ‘ला नीना’मुळे परिणाम होतो. ला निना आपल्या गतीने उष्णकटिबंधीय प्रदेशातीत चक्रिवादळांची दिशादेखील बदलू शकतो. तसेच ला निनामुळे उत्तर ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय आशियामध्ये मोठ्या प्रमाणात उबदार आर्द्रतेती स्थिती निर्माण होते. त्याचबरोर इंडोनेशिया आणि त्याच्या आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असते. इक्वाडोर आणि पेरू देशात दुष्काळीची स्थिती निर्माण होऊ शकते आणि ऑस्ट्रिलियात पूर येण्याची शक्यता वाढते. दरम्यान भारतात मोठ्या प्रमाणात थंडी आणि पाऊस पडण्याची शक्यता असते.

हे वाचलंत का?

Back to top button