उत्तराखंड : मसुरीमध्ये कार डोंगरावरून खाली कोसळली, ५ जणांचा मृत्यू

File photo
File photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमधील मसुरी-डेहराडून मार्गावरील झारीपाणीजवळ कार डोंगरावरून खाली कोसळली. यात ५ जणांचा मृत्यू झाला तर १ मुलगी गंभीर जखमी आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला.

चुनाखल-झारीपाणी रस्त्यावरील कमल कॉटेजजवळ आज (दि. ४) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. डेहराडूनमधील एका शैक्षणिक संस्थेचे सहा विद्यार्थी फोर्ड एंडेव्हर गाडीतून प्रवास करत होते. चुनाखलजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार वरच्या लेनमधून डोंगरातून खाली रस्त्यावर पडली. कारमध्ये चार तरुण आणि दोन मुली असे सहाजण प्रवास करत होते. त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला तर १ मुलगी गंभीर जखमी आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news