
पुढारी ऑनलाईन डेस्क: देशभरात ५ टप्प्यांत लोकसभा निवडणुका पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवार १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडेल असे जाहीर केले होते. यानुसार पहिल्या टप्प्यातील निवडणूक तयारीला वेग आला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Lok Sabha Election 2024)
लोकसभा निवडणुकीच्या अगोदर, मतदान पथके हेलिकॉप्टरने छत्तीसगड नक्षलग्रस्त भागात रवाना झाले आहेत. छत्तीसगडमधील लोकसभेच्या ११ जागांसाठी शुक्रवार १९ एप्रिल, २६ एप्रिल आणि ७ मे रोजी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. शुक्रवारी (दि.१९) एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात छत्तीसगडमधील बस्तर येथे एकाच ठिकाणी मतदान होणार असेल. देशातील अति संवेदनशिल भागात मतदान पथके हेलिकॉप्टरने रवाना झाल्याचे व्हिडिओ एएनआय ने शेअर केले आहेत. (Lok Sabha Election 2024)
लोकसभा निवडणूक मतदान पथके हेलिकॉप्टरने महाराष्ट्रातील गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात रवाना झाले आहेत. गडचिरोलीमध्ये पहिल्या टप्प्यात शुक्रवारी १९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेची ६ एमआय-१७ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत. (Lok Sabha Election 2024)
देशभरात १९ एप्रिल ते २० मे पर्यंत या कालावधित लोकसभा मतदानासाठीचे पाच टप्पे पार पडणार आहेत. पाच टप्प्यामध्ये १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे रोजी महाराष्ट्रात मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर देशातील सर्व राज्यातील लोकसभा निवडणूक निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे, असे निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केले होते. (Lok Sabha Election 2024)
पद्दुचेरी (१), मिझोरम(१), मेघालय(२), मध्य प्रदेश(६), मणिपूर(२), महाराष्ट्र (५), अरुणाचल प्रदेश(२), आसाम (५), बिहार (४), छत्तीसगड (१), जम्मू काश्मीर (१), लक्षद्वीप (१), राजस्थान (१२), सिक्कीम(१), तामिळनाडू(३९), त्रिपुरा (१), उत्तराखंड (५), उत्तर प्रदेश (८), प.बंगाल(३), नागालँड(१) आणि अंदमान निकोबार(१) या राज्यातील काही मतदार संघात पहिल्या टप्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
महाराष्ट्र विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या जिल्ह्यात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक मतदान प्रकिया शुक्रवार १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे.
हे ही वाचा: