पुढारी ऑनलाईन डेस्क :आपल्या एका मताने काय होणार आहे, असा नकारात्मक सुरू लावून काही लोक मतदान करण्याचे टाळतात. पण भारताच्या निवडणुकांच्या इतिहासात दोन घटना अशा आहेत, ज्यामध्ये फक्त एका मताने उमेदवारांना विधानसभेत पराभव पत्करावा लागला होता. तर १९ एप्रिल १९९९ला केंद्रातील वाजपेयी सरकार फक्त एका मताने कोसळले होते. (Lok Sabha Election 2024)
२००३मध्ये राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सी. पी. जोशी यांची नियुक्ती झाली. सी. पी. जोशी यांनी राजस्थान काँग्रेसची चांगली बांधणी केली आणि काँग्रेसने २००८ची विधानसभा जिंकली. पण सी. पी. जोशी यांचा मात्र धक्कादायक पराभव झाल. फक्त एका मताने सी. पी. जोशी पराभूत झाले होते. निकाल लागल्यानंतर जोशी यांनी टपाली मतांची मोजणी पुन्हा करण्याची मागणी केली. (Lok Sabha Election 2024)
जोशी यांच्या विरोधात कल्याण सिंग चव्हाण, रमेश चंद, ललीत तिवारी आणि रामचंद्र असे उमेदवार मैदानात होते. एकूण ५०१ टपाली मते होती, यातील १५८ मते अवैध ठरली. तर ३४३ मते वैध ठरली. यातील २१७ मते भाजपचे कल्याण सिंग चौहान यांना, जोशी यांना १२२, रमेश चंद यांना १, ललीत तिवारी यांना २ आणि रामचंद्र यांना १ मत मिळाले. EVMमध्ये काहीच बदल होण्याची शक्यता नसल्याने जोशी यांनी टपाली मतांची पुन्हा मोजणीची मागणी केली. ही मागणी मान्य करण्यात आली, पण पुन्हा मतमोजणी होऊनही मतांत कोणताच बदल झालेला नव्हता. त्यानंतर जोशी यांनी EVMमधील मतांची नव्याने मोजणीची मागणी केली, पण त्यातही काहीच फरक नव्हता. जोशी यांना ६२२१५ तर चव्हाण यांना अखेरीस जोशी यांनी पराभव मान्य केला. जोशी यांनी निवडणूक आयोगाचे नंतर आभारही मानले. (Lok Sabha Election 2024)
२००८मध्ये मध्य प्रदेशात नीना विक्रम वर्मा यांचा १ मताने विजय झाला होता. नीना वर्मा यांना ५०५१० मते मिळाली होती तर विरोधी बालमुकुंदसिंह यांना ५०५०९ मते मिळाली होती. (Power On one Vote)
१९९८ला अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीएचे सरकार सत्तेत होते. १३ महिन्यानंतर एआयएडीएमके या पक्षाने वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. १९ एप्रिल १९९९ला विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाले, यात वाजपेयी सरकारचा १ मताने पराभव झाला.
(संदर्भ – An Undocumented Wonder, लेखक – एस. वाय, कुरेशी )
हे ही वाचा: