नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत अवमानकारक विधान केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) आज सुलतानपूर न्यायालयात हजर झाले. त्यांना अर्ध्या तासाच्या तांत्रिक कोठडीनंतर जामीन मंजूर करण्यात आला.
संबंधित बातम्या
2018 मध्ये बंगळूर येथे एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत अवमानकारक विधान केले होते. त्याप्रकरणी भाजपचे नेते विजय मिश्रा यांनी सुलतानपूर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. याप्रकरणी न्यायालयाने गांधी यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते.
त्यानंतर मंगळवारी राहुल गांधी सुलतानपूरच्या न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना अर्धा तास तांत्रिक कोठडी दिली. या काळात गांधी यांच्या वकिलांनी जामिनाचा अर्ज सादर केला. न्यायालयाने गांधी यांना जामीन मंजूर केला.