पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी जम्मूला भेट देणार आहेत. दरम्यान, ते जम्मूतील विजयपूर (जि-सांबा) येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) उद्घाटन करणार आहेत. यापूर्वी फेब्रुवारी, २०१९ मध्ये पीएम मोदी यांनी या संस्थेची पायाभरणी केली होती. त्यानंतर ते उद्या जम्मूमधील विजयपूर येथे एम्सचे उद्घाटन करणार आहेत. हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत स्थापन केले जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. (PM Modi Visit Jammu)
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जम्मूमधून शिक्षण क्षेत्राला मोठी चालना देणार आहेत. देशभरातील शिक्षण आणि कौशल्य पायाभूत सुविधांच्या सुधारणा आणि विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असणार आहे. दरम्यान पीएम मोदी यावेळी सुमारे 13,375 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. हे सर्व प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात येत आहेत. देशाला समर्पित केलेल्या प्रकल्पांमध्ये आयआयटी भिलाई, आयआयटी तिरुपती, आयआयटी जम्मू, आयआयआयटीडीएम कांचीपुरमया कॅम्पसचा समावेश आहे. (PM Modi Visit Jammu)
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (IIS) प्रगत तंत्रज्ञानावर एक अग्रणी कौशल्य प्रशिक्षण संस्था कानपूर येथे आणि केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे दोन कॅम्पस देवप्रयाग (उत्तराखंड) आणि आगरतळा (त्रिपुरा) येथे पीएम मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात येत आहेत. IIM जम्मू, IIM बोधगया आणि IIM विशाखापट्टणम या देशातील तीन नवीन IIM चे उद्घाटन देखील उद्या पीएम नरेंद्र मोदी करणार आहेत. (PM Modi Visit Jammu)
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील केंद्रीय विद्यालयासाठी (KVs) २० नवीन इमारती आणि १३ नवीन नवोदय विद्यालय (NVs) इमारतींचे उद्घाटन देखील करतील. पंतप्रधान देशभरातील नवोदय विद्यालयांचे पाच केंद्रीय विद्यालय परिसर, एक नवोदय विद्यालय परिसर आणि पाच बहुउद्देशीय हॉलची पायाभरणी करतील. या नव्याने बांधण्यात आलेल्या KVs आणि NVs इमारती देशभरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही पीएमओ कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: