Cryptocurrency : बिटकाॅईन किंवा क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? | पुढारी

Cryptocurrency : बिटकाॅईन किंवा क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

पुढारी ऑनलाईन डेस्क

२९ नोव्हेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर क्रिप्टोकरन्सीचे (Cryptocurrency) विधेयक सादर केले जाणार, अशी चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘सिडनी डायलाॅग’मध्ये बोलताना म्हंटलं होतं की, जगभरातील देशांना क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण आणण्याचंही आवाहन केलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘क्रिप्टोकरन्सी’ म्हणजे नेमकं काय, याची सविस्तर माहिती आपण पाहू या…

… असा झाला जन्म बिटकाॅईनचा!

२००९ मध्ये पहिल्यांदा जगासमोर बिटकाॅईन हे नाव आले. तोपर्यंत बिटकाॅईनबद्दल कोणालाही काहीही माहीत नव्हते. परंतु, बिटकाॅईनला समजून घेण्यापूर्वी क्रिप्टोकरन्सी समजून घ्यायला हवी. क्रिप्टो हा एक ग्रीक भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ ‘रहस्य’ किंवा ‘गुप्त’ असा होतो. आणि करन्सी याचा अर्थ सर्वांना माहीत असेलच… करन्सी म्हणजे चलन किंवा मुद्रा होय.

रहस्यमय चलन, ज्याच्याबद्दल कोणालाही माहिती होता कामा नये. तर, या रहस्यमय चलनाच बिटकाॅईन किंवा व्हर्च्युअल करन्सी म्हणतात. बिटकाॅईन एक तंत्रज्ञानाचा चमत्कार म्हणता येईल, जो भौतिकदृष्टी अस्तित्वात नाही. थोडक्यात बिटकाॅईन हा एका अदृष्य असणाऱ्या परमेश्वरासारखा आहे. ज्याची आपण पूजा करतो, त्याला मानतो. पण, तो अस्तित्वात असत नाही.

Cryptocurrency

बिटकाॅईनची गोष्ट सांगायची झाली तर, २००८ मध्ये अमेरिकेमध्ये आर्थिक मंदी आलेली होती. ज्याच्या परिणाम, संपूर्ण जगावर कमी-अधिक प्रमाणात झाला. त्यामुळे काही दिवसांसाठी का होईन लोकांचा बॅंक किंवा आर्थिक संस्थांवरून विश्वास उडाला होता. याच कारणामुळे जगातील पहिलं स्वतंत्र चलन बिटकाॅईनचा जन्म झाला.

असं  म्हणतात की, २००९ मध्ये जपानचे एक वैज्ञानिक सातोषी नाकामोतो यांनी बिटकाॅईनचा अविष्कार केला होता. परंतु, त्याचा ठोस पुरावा आपल्याला सापडत नाही. काही लोकांच्या मते, बिटकाॅईनचा अविष्कार हा एका व्यक्तीने नाही, तर एका समुहाने तयार केला आहे. काही लोकांनी तर स्वतःच सातोषी नाकामोतो असल्याचा दावा केला आहे. परतु, या नावाच व्यक्तीच जगात अस्तित्वात नाही.

कोणतीच बॅंक क्रिप्टोकरन्सी नियंत्रण ठेवत नाही

बिटकाॅईन किंवा क्रिप्टोकरन्सी या चलनांमागे नेमकं कोणतं तंत्रज्ञान होतं? तर, त्याला ब्लाॅक टेक्नाॅलोजी असं नाव आहे. ब्लाॅक आणि चेन या इंग्रजी नावांमध्ये आपल्याला हा खेळ समजून घेता येईल. असं समजा, हा एक डाटाबेस आहे. ज्यामध्ये लाखो ब्लाॅक्स म्हणजे कम्प्युटर्सची चेन आहे.

जे इंटरनेट नेटवर्कसोबत जोडलेले आहे आणि सर्वांमध्ये ट्रान्जेक्शनचा डेटा सेव्ह करून ठेवला आहे. सहाजिक कोणतीही एक व्यक्ती, कायदेशीर व्यक्ती किंवा सरकार त्यावर नियंत्र मिळवू शकत नाही. कोणीही हॅक करू शकत नाही की, कोणतीही छेडछाड करू शकत नाही. त्यामुळेच बिटकाॅईनला सुरक्षित चलन मानलं जातं. कारण, त्याच्यावर कोणाचं नियंत्रणच नाही.

Cryptocurrency

दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर, बिटकाॅईन हे स्वतंत्र चलन असणंच त्याचे सर्वांच महत्वाचे वैशिष्ट्य आहे. रुपये, डाॅलर आणि युरो या चलनांसारखं केंद्रीय बॅंककडून बिटकाॅईनवर नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे बिटकाॅईनचा पत्ता शोधून काढता येत नाही.

कारण, केंद्रीय बॅंककडून तुमचं ट्रान्जेक्शन सेकंदाच माहिती होऊ शकतं. त्यामुळेच बेकायदेशीर व्यवहार करण्यासाठी बिटकाॅईनचा मार्ग सोईस्कर असतो. सहाजिकच बिटकाॅईनमध्ये खंडणी मागणं, ही नवी गोष्ट राहिलेली नाही.

क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार होतो कसा?

बिटकाॅईनचा व्यवहार हा कोडद्वारे केला जातो. जर तुम्हाला बिटकाॅईन खरेदी करायचं असेल, तर तुम्हाला त्याच्या कीज (कोड्स) मिळते. ज्याद्वारे जगभरात पसरलेल्या नेटवर्कमध्ये व्हेरिफाय केले जाते. जेव्हा तुम्हाला बिटकाईन विकायचा असेल, तुम्हाला मिळालेला नवा कोड विकावा लागेल. खरंतर आता मार्केटमध्ये कित्येक एक्सचेंज अ‍ॅप आलेले आहेत जे कमिशनवर काम करतात.

क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारासंबंधी भारतातही होतेय तयारी

जगभरात सुमारे २०० क्रिप्टोकरन्सी व्यवहारात वापरले जाताहेत. त्यामध्ये बिटकाॅईन, लाईटकाॅईन, इथेरियम, जॅडकॅश, स्टेलर ल्युमॅन आदी व्हर्च्युअल चलणं आघाडीवर आहेत. जगातील अनेक देशांमध्ये क्रिप्टोकरन्सीला मान्यता देण्यात आली आहे. मात्र, भारताने अशा चलणांना मान्यता दिलेली नाही. पण, याविषयी सरकारमध्ये चर्चा सुरू आहेत, वित्तीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची या विषयासंदर्भात तज्ज्ञांशी चर्चा करून झालेली आहे.

Cryptocurrency

यामध्ये लवकर तज्ज्ञांची समिती तयार करून अभ्यास केला जाण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला यामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर पहिल्यांदा त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या. नंतर निर्णय घ्या. जगभरात केवळ २१ मिलीयन बिटकाॅईन निर्माण केले जाऊ शकतात. २०२१ पर्यंत १८ मिलीयन बिटकाॅईन निर्माण झालेले आहेत आणि असं मानलं जात आहे की, २१४० पर्यंत शेवटचा बिटकाईन निर्माण होऊ शकेल. .

बिटकाॅईनची सुरुवातीची किंमत किती होती?

बिटकाॅईनच्या किमतीबद्दल किंवा गुंतवणुकीबद्दल सुरक्षित असण्याची अपेक्षा करता. मात्र, बिटकाॅईनमध्ये केलेल्या गुंतवणुकीबद्दल कोणतीच खात्री नाही. कारण, बिटकाॅईनची किंमत ३० टक्क्यांनी घसरलेली होती, हे आपण नुकतंच पाहिलं आहे.

काही दिवसांपूर्वी एका बिटकाॅईनची किंमत ही भारतीय मुल्यानुसार ५० लाखांपर्यंत गेली होती. इलाॅन मस्कच्या एका ट्विटने आणि चीनच्या झटक्यानंतर बिटकाॅईनचे मूल्य २८ ते ३० लाखांदरम्यान आलेले आहे. परंतु, १० वर्षांपूर्वी एका बिटकाॅईची किंमत केवळ १ डाॅलर इतकी होती. याचाच अर्थ साधारण फक्त ५० रुपये इ्तकंच मूल्य एका बिटकाॅईनचं होतं.

हे वाचलंत का? 

Back to top button