अयोध्या; वृत्तसंस्था : अयोध्येत रामलल्लाचे आगमन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा ही भारतवर्षाच्या पुनर्उभारणीची सुरुवात असल्याचे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
सोमवारी होणार्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भागवत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. भागवत यांचा एक लेख रा. स्व. संघाने आपल्या वेबसाईटवर रविवारीच प्रकाशित केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी हिंदू समाजाने प्रचंड संघर्ष केला; पण आता मंदिर उभारले गेले आहे. रामलल्ला आपल्या जन्मस्थळी परतत आहे. आता त्या कटू संघर्षाचा गोड शेवट झाला आहे. सोमवारचा सोहळा हा भारतवर्षाच्या पुनर्उभारणीचा प्रारंभ आहे.