मालदीव प्रश्‍नी परराष्‍ट्र मंत्री जयशंकर यांनी सोडले मौन; म्‍हणाले, “राजकारण हे…”

File Photo
File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मागील काही दिवसांमध्‍ये भारताचे मालदीवबरोबर असणारे संबंध ताणले गेले आहेत. आता याप्रश्‍नी परराष्‍ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मौन सोडले आहे. याबाबत त्‍यांनी सूचक विधान करत भारताची भूमिका स्‍पष्‍ट केली आहे. ( External Affairs Minister S Jaishankar Breaks Silence On India-Maldives Row )

नागपूरमध्‍ये बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्‍हणाले की, प्रत्येकजण भारताला सदैव साथ देईल याची जबाबदारी कोणीही घेऊ शकत नाही.राजकारण हे राजकारण असते. प्रत्येक देशातील प्रत्येकजण आम्हाला नेहमीच पाठिंबा देईल किंवा आमच्याशी सहमत असेल, याची मी खात्री देऊ शकत नाही. आम्ही देशांशी संपर्क मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यात आम्ही बऱ्याच अंशी यशस्वी झालो आहोत. गेल्या 10 वर्षांत आम्ही अनेक देशांशी चांगले संबंध निर्माण केले आहेत, असेही त्‍यांन स्‍पष्‍ट केले. ( External Affairs Minister S Jaishankar Breaks Silence On India-Maldives Row )

राजकारण चढ-उतारांनी भरलेले असू शकते

राजकारण अस्थिर असू शकते, परंतु त्या देशातील लोकांची भारताप्रती चांगली भावना आहे. त्यांना चांगले संबंध असण्याचे महत्त्व समजते. कधीकधी गोष्टी योग्य मार्गाने जात नाहीत; मग सर्वकाही बरोबर करण्यासाठी तुम्हाला वाद घालावे लागतील, असे स्‍पष्‍ट करत इतर देशांतील पायाभूत सुविधांच्या विकासात भारताच्या सहभागाचाही उल्लेखही त्‍यांनी यावेळी केला. ( External Affairs Minister S Jaishankar Breaks Silence On India-Maldives Row )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याबद्दल मालदीवच्या काही राजकीय नेत्यांनी मंत्र्यांसह अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यात वाद निर्माण झाला आहे. मालदीवच्‍या मंत्र्यांनी मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याचा अंदाज भारतीय पर्यटकांना मालदीवपासून लांब राहण्‍यचा सल्‍ला मानला. भारताने मालदीवकडे हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ७ जानेवारी रोजी तीन मंत्र्यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आले. यानंतर मालदीवच्या भारतातील राजदूतांना समन्‍स बजावण्‍यात आले. त्‍यांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले. त्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात सोशल मीडिया पोस्टबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती.

मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यावर केलेल्‍या आक्षेपार्ह टीकेमुळे भारतीय संतप्त झाले. मालदीवमध्‍ये साजरी करण्‍यात येणार्‍या नियोजित सुट्ट्या रद्द केल्या यानंतर चीनमध्ये राज्य दौऱ्यावर असलेले मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू यांनी आमच्‍या देशात अधिक पर्यटकांना पाठवा, अशी याचनाच चीनला केली आहे.

नुकतेच चीन दौर्‍याची सांगता झाल्‍यानंतर शनिवारी( दि.१३) माध्‍यमांशी बोलताना मालदीवचे अध्‍यक्ष मुईइ्‍झू भारतावर अप्रत्‍यक्ष टीका करताना म्‍हणाले की, कोणत्‍याही देशाला आम्‍हाला धमकवण्‍याचा अधिकार नाही. आम्ही लहान असू शकतो; परंतु हा तुम्हाला आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना देत नाही,"

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps.

Stay updated with the latest news at your fingertips.

Android

iOS

Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news