पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराने आज मंगळवारी तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४५० अंकांनी वाढून ७१,८00 पार झाला. तर निफ्टी १५० अंकांच्या वाढीसह २१,६६० वर गेला. बाजारात सर्वाधिक खरेदी ऑटो, पीएसयू बँक, मेटल क्षेत्रात दिसून येत आहे. (Stock Market Opening Bell)
सेन्सेक्स आज ७१,७७० वर खुला झाला. त्यानंतर तो ७१,८७० पर्यंत गेला. सेन्सेक्सवर विप्रो, टेक महिंद्रा, एलटी, इन्फोसिस, टीसीएस, टाटा मोटर्स, एसबीआय हे शेअर्स सर्वाधिक वाढले आहेत. सेन्सेक्सवरील टॉप ३० मधील सर्व शेअर्स हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत.
एनएसई निफ्टीवर अदानी पोर्टस्, बजाज ऑटो, विप्रो, LTIMINDTREE आणि अदानी एंटरप्रायजेस हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर ब्रिटानियाच्या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून येत आहे.
याआधी सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात नफावसुली दिसून आली होती. यामुळे सेन्सेक्स ६७० अंकांनी घसरून ७१,३५५ वर बंद झाला होता. (Stock Market Opening Bell)
हे ही वाचा :