नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारत सरकारने आणलेल्या तीन नवीन फौजदारी कायद्यांमध्ये भारताचा आत्मा आहे म्हणत सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अदिश अग्गरवाला यांनी या कायद्यांचे स्वागत केले. तसेच यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले. Criminal Laws
या नव्या कायद्यांमुळे जात, समुदाय, वंश, लिंग, भाषा किंवा मूळ स्थानाच्या आधारावर द्वेषपूर्ण गुन्ह्यांसह जमावाने ठेचुन मारणे याचे वेगळे गुन्हे म्हणून वर्गीकरण करणे यासारख्या सध्याच्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या तरतुदींची अंमलबजावणी आणि पीडितांना आधार देणे अपरिहार्य असेल. पोलीस आणि न्यायालयीन कर्मचार्यांना संवेदनशीलतेचे प्रशिक्षण दिल्याने ही प्रकरणे निष्पक्षपणे हाताळली जातील. गुन्ह्याच्या ठिकाणाची पर्वा न करता पोलीस अधिकार्यांकडून तक्रार नोंदवण्यातील सुधारणा आणि खटले वेळेत निकाली काढण्याचेही आम्ही स्वागत करतो, त्यामुळे केवळ कायदेशीर व्यवस्थाच मजबूत होत नाही तर आपल्या देशातील नागरिकांना विश्वास वाटतो. असेही डॉ. अदिश अग्गरवाला म्हणाले. Criminal Laws
तसेच या नवीन कायद्यांमध्ये महिला आणि मुलांवरील गुन्हे, मानवी शरीरावर परिणाम करणाऱ्या बाबी, देशाच्या सीमांची सुरक्षा, लष्कर, नौदल आणि हवाई दलाशी संबंधित गुन्हेगारी, निवडणूक गुन्हे, चलनी नोटा आणि नाण्यांशी छेडछाड इत्यादींना आवश्यक प्राधान्य आणि महत्त्व दिले गेले आहे. हे कायदे तपासामध्ये न्यायवैद्यक पद्धतींचा वापर करण्यास आणि कायदेशीर प्रक्रिया सुधारण्यासाठी विविध प्रक्रियांचा वापर करण्यास प्रोत्साहित करतात. न्यायवैद्यक पुराव्यावर जास्त अवलंबून राहताना देखील त्याच्या गैरवापरापासून संरक्षणाची आवश्यकता असते. असेही डॉ. अदिश अग्गरवाला म्हणाले.
हेही वाचा