तिरूवअनंतपूरम : काँग्रेस नेते आणि तिरूवअनंतपूरमचे खासदार शशी थरूर यांनी 2024 लोकसभा ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे संकेत दिले आहेत. ते पत्रकार परिषदेत म्हणाले की, 2024 मध्ये शेवटची निवडणूक लढवू शकतो. राजकारणात काहीही होऊ शकते. त्यामुळे माझा निर्णय हा अंतिम असेलच असे नाही. काहीवेळा मला वाटते की आता राजकारणात तरुणांना संधी द्यायला हवी.
मी तिरूवअनंतपूरममधून निवडणूक लढवल्यास तर ती मी ताकदीने लढवेन आणि समाजसेवा करेन. यापूर्वीही थरूर यांनी एक टीव्ही शोमध्ये 2024 लोकसभा ही माझी शेवटची निवडणूक असेल. पण यावर थरूर म्हणाले की, अद्याप याबाबत काहीच ठरवलेली नाही. मी केवळ शक्यता वर्तवली होती. राजकारणात काही होऊ शकते. त्यामुळे माझा निर्णय बदलूही शकतो.