पुलवामासारखा हल्ला पुन्हा लवकरच घडवू; देवबंद मदरशातील विद्यार्थ्याची धमकी

पुलवामासारखा हल्ला पुन्हा लवकरच घडवू; देवबंद मदरशातील विद्यार्थ्याची धमकी
Published on
Updated on

सहारनपूर; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातील एका मदरशातील विद्यार्थ्याने लवकरच पुलवामासारखा हल्ला होणार असल्याची धमकी सोशल साईटवरून दिली आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मोहम्मद ताल्ला मजहर (झारखंड) याला अटक केली आहे.

दहशतवादी कारवायांशी संबंधित नेहमी चर्चेत असणार्‍या देवबंद येथील एका मदरशातील विद्यार्थ्याच्या धमकीने उत्तर प्रदेशपासून दिल्लीपर्यंत खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्याने 'एक्स' या सोशल साईटवरून धमकी दिली आहे. पुलवामासारखा दहशतवादी हल्ला पुन्हा लवकरच होणार असल्याची धमकी त्याने दिली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 'एटीएस'ने त्वरित त्याला अटक केली. देवबंद येथील मदरशात तो इस्लामचे शिक्षण घेत आहे. तो मूळचा झारखंडमधील जमशेदपूर सरायकेला येथील आहे. देवबंदमध्ये तो भाड्याच्या घरात वास्तव्य करीत आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.

देवबंद नेहमीच चर्चेत

देवबंद फतव्यांसाठी नेहमी चर्चेत असते. कधी बांगला देशी, तर कधी पाकिस्तानी नागरिकांच्या घुसखोरीवरून देवबंदचे नाव पुढे येते. दहशतवादी कारवायांवरूनही या ठिकाणी अनेकांना अटक करण्यात आली आहे.

कुणाच्या संपर्कात?

स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याच्याकडील मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडील पुस्तकेही ताब्यात घेण्यात आली आहेत. व्हॉटस्अ‍ॅप, यूट्यूबवरून तो कुणा कुणाच्या संपर्कात आहे, याची माहिती घेतली जात असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक विपीन ताडा यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news